पुणे : भारत आणि श्रीलंका यांच्यातली तिसरी टी-२० मॅच आज पुण्यात खेळवण्यात येणार आहे. गुवाहाटीची पहिली टी-२० मॅच पावसामुळे रद्द झाल्यानंतर इंदूरमध्ये झालेल्या दुसऱ्या टी-२०मध्ये भारताचा विजय झाला. आता तिसरी टी-२० जिंकून सीरिज खिशात टाकण्याची संधी भारताला आहे.
भारत आणि श्रीलंका यांच्यात पुण्याच्या स्टेडियममध्ये ४ वर्षांपूर्वीही टी-२० मॅच झाली होती. या मॅचमध्ये श्रीलंकेने भारताला १०१ रनवर ऑलआऊट केलं होतं. श्रीलंकेने ही मॅच ५ विकेटने जिंकली होती.
दुसऱ्या टी-२० मॅचमध्ये भारताला अगदी सोपा विजय मिळाला. भारतीय बॉलरनी श्रीलंकेच्या बॅट्समनना मोठा स्कोअर करुन दिला नाही. तसंच भारताच्या सगळ्याच बॅट्समननी रनही केल्या. शार्दुल ठाकूरला सर्वाधिक ३ विकेट मिळाल्या तर नवदीप सैनीला २ आणि जसप्रीत बुमराहला १ विकेट मिळाली. ४ ओव्हरमध्ये १८ रन देऊन २ विकेट घेणाऱ्या नवदीप सैनीला मॅन ऑफ द मॅच देऊन गौरवण्यात आलं.
श्रीलंकेकडून कुसल परेराने सर्वाधिक ३४ रन केले. रोहित शर्माच्या अनुपस्थितीमध्ये भारताच्या बॅट्समननी श्रीलंकेच्या आव्हानाचा सहज पाठलाग केला. राहुलने ३२ बॉलमध्ये ४५ रन तर शिखर धवनने २९ बॉलमध्ये ३२ रन केले. श्रेयस अय्यरने २६ बॉलमध्ये ३४ रनची खेळी केली, तर विराट १७ बॉलमध्ये ३० रनवर नाबाद राहिला.
विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, केएल राहुल, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, मनिष पांडे, संजू सॅमसन, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, युझवेंद्र चहल, नवदीप सैनी
लसिथ मलिंगा (कर्णधार), ओशाडा फर्नांडो, वानिंडू हसरंगा, दनुष्का गुणतिलका, कुसल परेरा, निरोशन डिकवेला, एंजलो मॅथ्यूज, आविश्का फर्नांडो, धनंजय डिसिल्वा, लाहिरु कुमारा, कुशल मेंडिस, भानुका राजपक्षा, कासुन राजिथा, लक्षण संदकाना, दासुन शनाका