त्रिनिदाद : टीम इंडिया आज वेस्ट इंडिजविरुद्ध दुसरा T20 सामना खेळणार आहे. ही दुसरी वनडे जिंकून टीम इंडियाला मालिकेत 2-0 अशी आघाडी घ्यायची आहे. या सोबतच हा विजय़ मिळवून टीम इंडियाला एका मोठ्या रेकॉर्डची बरोबरी करण्याची संधी आहे. आता ही संधी टीम इंडिया बळकावते का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
टीम इंडिया आज वेस्ट इंडिजमध्ये पाच सामन्यांच्या T20I मालिकेतील दुसरा सामना सोमवारी बसेटेरे (सेंट किट्स) येथे खेळवला जाणार आहे. या मालिकेत 1-0 ने आघाडीवर असलेल्या टीम इंडियाने हा सामना जिंकल्यास पाकिस्तानच्या मोठ्या विक्रमाची बरोबरी होईल.
वेस्ट इंडिजचा चांगला रेकॉर्ड
टीम इंडिया पहिल्यांदाच सामना खेळण्यासाठी या मैदानावर उतरणार आहे. तर यजमान वेस्ट इंडिजचा येथे चांगला ट्रॅक रेकॉर्ड आहे. कॅरेबियन संघाने येथे 10 T20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यामध्ये 6 जिंकले आहेत आणि 2 हरले आहेत. 2 सामने अनिर्णित होते.
सर्वाधिक सामने जिंकण्याची संधी
भारतीय संघाने हा सामना जिंकल्यास वेस्ट इंडिजविरुद्ध सर्वाधिक टी-20 सामने जिंकण्याच्या बाबतीत पाकिस्तानच्या विक्रमाची बरोबरी होईल. भारताने वेस्ट इंडिजविरुद्ध आतापर्यंत 21 सामने खेळले आहेत. यामध्ये 14 जिंकले असून 6 मध्ये पराभव झाला आहे. 1 सामन्याचा निकाल लागला नाही.
तर पाकिस्तानने वेस्ट इंडिजविरुद्ध 21 पैकी 15 सामने जिंकले आहेत. तीन सामन्यांत तो पराभूत झाला आणि तीन सामन्यांचा निकाल लागला नाही. म्हणजेच आज विजय मिळवल्यास भारतीय संघ पाकिस्तानच्या विक्रमाची बरोबरी करेल. दरम्यान टीम इंडिया विजय मिळवतो का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.