जयपूर : मुंबईने राजस्थानला विजयासाठी १६२ रनचे आव्हान दिले आहे. मुंबईने २० ओव्हरमध्ये ५ विकेट गमावून १६१ रन केल्या. मुंबईकडून सर्वाधिक ६५ रन क्विंटन डी कॉकने केल्या. तर सूर्यकुमार यादवने ३४ रन करत त्याला चांगली साथ दिली.
QDK's second successive fifty against RR helps us set a 162-run target at the Sawai Mansingh Stadium. Let's defend this, boys #OneFamily #CricketMeriJaan #MumbaiIndians #RRvMI @QuinnyDeKock69 pic.twitter.com/FunoyEkDsU
— Mumbai Indians (@mipaltan) April 20, 2019
राजस्थानने टॉस जिंकून मुंबईला बॅटिंग करण्यास भाग पाडले. मुंबईने आपली पहिली विकेट ३ ऱ्या ओव्हरमध्ये गमावली. श्रेयस गोपालने त्याच्या बॉलिंगवरच रोहित शर्माला कॅचआऊट केले. रोहित ११ रन करुन माघारी परतला. यानंतर आलेल्या सूर्यकुमार यादवने डीकॉक ला चांगली साथ दिली. रोहित-सूर्यकुमार या जोडीने मुंबईच्या डावाला स्थिरता दिली. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ९७ रनची पार्टनरशीप केली. मुंबईचा स्कोअर १०८ असताना सूर्यकुमार यादव स्टुअर्ट बिन्नीच्या बॉलिंगवर कॅचआऊट झाला. सूर्यकुमारने ३४ रनची खेळी केली. सूर्यकुमार नंतर मैदानात हार्दिक पांड्याला पाठवण्यात आले.
सूर्यकुमार आऊट झाल्यानंतर अवघ्या ४ बॉलनंतर क्विंटन डी कॉक ६५ रन करुन आऊट झाला. डी कॉकला चांगली सुरुवात मिळाली होती. त्याला शतकी खेळी करण्याची संधी होती. परंतु त्याला आपल्या खेळीची मोठ्या आकड्यात रुपांतर करता आले नाही. किरॉन पोलार्डला देखील विशेष करता आले नाही. जयदेव ऊनाडकटने पोलार्डला बोल्ड केले. पोलार्ड १० रन करुन तंबूत परतला. हार्दिक पांड्याने शेवटच्या टप्प्यात २३ रनची उपयोगी खेळी केली. शेवटच्या टप्प्यात राजस्थानच्या बॉलर्सनी मुंबईचा रनांना ब्रेक लावला. राजस्थान कडून श्रेयस गोपाळने २ विकेट घेतल्या. तर स्टुअर्ट बिन्नी, जोफ्रा आर्चर आणि जयदेव ऊनाडकटने प्रत्येकी १ विकेट घेतली.