मुंबई: IPL 2021या पहिल्या टप्प्यात कोरोना शिकरल्यानं 4 मे रोजी सामने स्थगित करण्यात आले होते. आता उर्वरित सामने सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात होणार आहेत. या सामन्याआधी कोलकाता संघाला दणका बसला आहे. कोलकाता संघातील स्टार खेळाडूने आयपीएलच्या उर्वरित सामन्यांमधून माघार घेतली आहे. त्यामुळे कोलकाता संघाला मोठा धक्का बसणार आहे.
IPL पुन्हा सुरू होण्याआधी काही खेळाडूंनी आपलं नाव मागे घेतलं आहे. ऑस्ट्रेलियाचा अनुभवी वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सने सप्टेंबरमध्ये सुरू होणार्या आयपीएल 2021 च्या उर्वरित सामन्यांमधून माघार घेतली आहे. कमिन्स आयपीएलच्या 14 व्या सत्रात कोलकाता नाईट रायडर्स संघाचा एक भाग आहे.
कोलकाता संघाचा विकेटकीपर दिनेश कार्तिकला त्याने आपण माघार घेत असल्याचं सांगितलं आहे. तर इयोन मॉर्गन देखील खेळेल की नाही याबाबत अद्याप प्रश्नचिन्हं आहे. त्यामुळे आयपीएलच्या उर्वरित सामन्यातून आणखी कोणकोण विदेशी खेळाडू माघार घेतात हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे
ऑस्ट्रेलियाकडून आयपीएल 2021 च्या उर्वरित सामन्यांबाबत कोणतेही अधिकृत विधान आलं नाही. इंग्लंड अॅण्ड वेल्स क्रिकेट बोर्डाने आधीच हे स्पष्ट केले आहे की त्याचे खेळाडू आयपीएलसाठी आंतरराष्ट्रीय सामने खेळणार नाहीत. ईसीबी क्रिकेटचे संचालक एश्ले जाइल्स यांनी गेल्या महिन्यात सांगितले होते की इंग्लंडचे पूर्ण वेळापत्रक होते. कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आलेल्या आयपीएलचे उर्वरित सामने सप्टेंबरमध्ये युएईमध्ये होणार आहेत.