IPL 2021 MI vs RCB: मॅक्सवेलचा तुफान षटकार, व्हिडीओ पाहून व्हाल हैराण

चर्चा तर होणारच! मॅक्सवेलचा सुपर सिक्स नाही पाहिला? मग मिस करू नका पाहा व्हिडीओ

Updated: Apr 10, 2021, 09:21 AM IST
IPL 2021 MI vs RCB: मॅक्सवेलचा तुफान षटकार, व्हिडीओ पाहून व्हाल हैराण title=

चेन्नई: मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू नुकताच IPLमधील पहिला सामना पार पडला. या सामन्यात ग्लॅन मॅक्सवेलचा जलवा पाहायला मिळाला. RCBसंघातून डेब्यू करत त्याने पहिलाच षटकार ठोकला. हा षटकार इतका जबरदस्त होता की त्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. 

मागच्या हंगामात खराब कामगिरी करणाऱ्या ग्लॅन मॅक्सवेलनं यंदाच्या हंगामात पहिल्याच सामन्यात तुफान आणलं. 2018पासून त्याने टी 20 सामन्यात एकही षटकार ठोकला नव्हता. कोहलीच्या संघात IPLच्या पहिल्याच सामन्यात त्याने षटकार ठोकला.

दुसरं आणि सर्वांत महत्त्वाचं कारण म्हणजे हा षटकार इतका जबरदस्त होता की थेट बॉल स्टेडियम बाहेर गेला. ग्लॅम मॅक्सवेलनं मैदानात येताच 100 मीटर लांब षटकार ठोकल्यानं त्याचं कौतुक होत आहे. त्याचा हा षटकार पाहून RCBचा कर्णधार विराट कोहली देखील एक क्षण हैराण झाला.

कृणाल पांड्याच्या चेंडूवर त्याने ठोकलेल्या जबरदस्त षटकारानं सर्वांच्या भुवया उंचावल्या. 11 व्या ओव्हरच्या पहिल्याच चेंडूवर त्याने ही कमाल केली आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही त्याचं कौतुक केल्याशिवाय राहणार नाही इतका तुफानी षटकार होता.