मुंबई: चेन्नई विरुद्ध पंजाब नुकत्याच झालेल्या सामन्यात महेंद्र सिंह धोनीच्या संघाला 6 विकेट्सनं पंजाबवर विजय मिळण्यात यश आलं. या विजयाचं श्रेय रविंद्र जडेचा, दीपक चहर, मोईन अली यांना जातं. तर सामन्यानंतर बॉलर दीपक चहरनं एक किस्सा सर्वांसोबत शेअर केला आहे.
शार्दुल ठाकूरनं यावेळी दीपक चहरला प्रश्न विचारला की होम ग्राऊंड माझं असतानाही तुझी कामगिरी इथे जबरदस्त ठरली. त्यावर बोलताना दीपक चहरनं एक अनुभव सांगितला आणि चाहते आणि क्रिकेटप्रेमींना आवाहन देखील केलं.
दीपक म्हणतो की, माझी पहिल्या सामन्यातील कामगिरी खूपच वाईट होती. त्यावर खूप ट्वीट देखील येत होते. त्यातील एक मेसेज असा होता की तू खूप चांगला बॉलर आहेस पण प्लीज पुढचा सामना नको खेळूस. हा अनुभव सांगितल्यानंतर त्याने सर्व चाहत्यांना टीमला सपोर्ट करण्याचं आवाहन देखील केलं आहे.
CSKचा कर्णधार महेंद्र सिंह धोनीनं दाखवलेल्या विश्वासाला चहर उतरला आणि पावर प्लेमध्ये त्याने पंजाबच्या फलंदाजांना संकटात टाकलं. त्याने 4 विकेट्स आपल्या नावावर केल्या आहेत. त्याच्या कामगिरीबद्दल महेंद्र सिंह धोनी आणि टीम इंडियाचे कोच रवी शास्त्री यांनी चहरची पाठ थोपटली आहे.
चहरकडे मोठी जबाबदारी देण्याबाबत माही काय म्हणाला?
दीपक चहरने थेड ओव्हरमध्ये गोलंदाजी करण्याऐवजी आता पावर प्लेमध्ये गोलंदाजी करावी असा धोनीचा मानस आहे. थेड ओव्हरसाठी संघात दुसरा गोलंदाज आहे. मात्र कालच्या सामन्यानंतर चाहरने पावर प्लेमध्येच गोलंदाजी करावी आणि ही जबाबादारी धोनी चाहरला देणार असल्याची माहिती मिळाली आहे.