मुंबई: पंजाब संघाने बल्ले बल्ले करत बंगळुरू संघावर 34 धावांनी विजय मिळवला आहे. त्याच दरम्यान पंजाब संघाला मोठा धक्का बसला आहे. पंजाबचा स्टार बॉलर जखमी झाला आहे. बंगळुरूच्या फलंदाजाने मारलेला बॉल थेट पायावर जोरात बसल्यानं पंजाबच्या बॉलरला दुखापत झाली आणि मैदान सोडावे लागले.
पंजाब संघातील स्टार बॉलर राइली मेरेडिथ सामना संपण्याआधी जखमी झाला. आता पुढील सामन्यासाठी मेरेडिथ खेळू शकणार की नाही याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर येऊ शकली नाही. मात्र त्याच्या पायाला बॉलचा फटका खूप जोरात बसला. त्यामुळे मेरेडिथ खाली बसला. सर्व खेळाडू आणि फिजिशियन तिथे आले. त्यांनी मेरेडिथला तपासलं.
मेरेडिथला झालेल्या दुखापतीमुळे तो मैदान सोडून बाहेर गेला. पुढची गोलंदाजी करू शकला नाही. 3 सामने बाहेर राहिल्यानंतर मेरेडिथला बंगळुरू विरुद्ध खेळण्याची संधी मिळाली होती. विराट कोहली आणि देवदत्त पडिक्कलला मेरेडिथने हैराण केलं. देवदत्तला तर आऊट देखील केलं.
मेरेडिथने 3.2 ओव्हरमध्ये 29 रन देऊन एक विकेट घेतली त्यानंतर तो पुढे खेळू शकला नाही. दुखापत झाल्यामुळे त्याला मैदान सोडावं लागलं. त्याला दुखापत किती गंभीर आहे आणि पुढच्या सामन्यात पुन्हा खेळू शकणार की नाही याबबत अद्यापतरी कोणतीही माहिती मिळू शकली नाही.