मुंबई : आयपीएलच्या 14 व्या मोसमातील दुसऱ्या टपप्याला येत्या 17 सप्टेंबरपासून सुरुवात होत आहे. याआधीच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला मजबतू धक्का बसला आहे. आरसीबीचा स्टार ऑलराऊंडर खेळाडू वॉशिंग्टन सुंदर दुखापतीमुळे या दुसऱ्या टप्प्यातून बाहेर पडला आहे. त्यामुळे बंगळुरुसाठी हा मोठा धक्का आहे. आरसीबीच्या अधिकृत ट्विटर हॅन्डलवरुन याबाबतची माहिती देण्यात आली आहे. (IPL 2021 royals challengers banglore all rounder washington sundar has been ruled out of remainder 14 season due to finger injury)
सुंदरला बोटाला झालेल्या दुखापतीमुळे या दुसऱ्या टप्प्याला मुकावं लागलं आहे. वॉशिंग्टनला इंग्लंड दौऱ्यावर असताना ही दुखापत झाली होती. यानंतर त्याला मायदेशी परतावं लागलं होतं. सुदंरने आयपीएल्या 14 व्या हंगामातील पहिल्या टप्प्यात फारशी चमकदार कामगिरी करता आली नाही. त्याने 6 सामन्यांमध्ये अवघ्या 31 धावाच केल्या होत्या. तसेच 3 विकेट्सही पटकावल्या होत्या. दरम्यान इतक्या दिवसांनंतरही वॉशिंग्टन दुखापतीनंतर सावरलेला नाही.
वॉशिंग्टनच्या जागी कोणाला संधी?
दरम्यान वॉशिंग्टनच्या जागी संघात आकाश दीपला संधी देण्यात आली आहे. आकाश दीप हा वेगवान गोलंदाज असून तो बंगालसाठी खेळतो. आकाश सध्या आरसीबीसाठी नेट बॉलर आहे.
आरसीबी पॉइंट्सटेबलमध्ये कितव्या स्थानी?
आरसीबी पॉइंट्सटेबलमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे. बंगळुरुने या मोसमात 7 सामने खेळले आहेत. या 7 सामन्यांपैकी विराटच्या टीमने 5 सामन्यात विजय मिळवले आहेत. तर 2 वेळा पराभवाचा सामना करावा लागला. आरसीबी 10 गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर विराजमान आहे.
ANNOUNCEMENT
Washington Sundar has been ruled out of the remainder of #IPL2021 as he hasn’t fully recovered from his finger injury. Akash Deep, a state cricketer from Bengal who until now was a net bowler with RCB, has been named as Washi’s replacement. #PlayBold pic.twitter.com/azaMgkaDZp
— Royal Challengers Bangalore (@RCBTweets) August 30, 2021