IPL 2022 : Delhi Capitals चा मोठा धक्का, या खेळाडूला रुग्णालयात केलं दाखल

संघाचा एक सर्वोत्तम खेळाडू सामन्यातून बाहेर पडल्याने संघाला धक्का

Updated: May 8, 2022, 10:29 PM IST
IPL 2022 : Delhi Capitals चा मोठा धक्का, या खेळाडूला रुग्णालयात केलं दाखल title=

CSK vs DC : IPL 2022 च्या 55 व्या सामन्यात, दिल्ली कॅपिटल्स (DC) विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स (CSK) सामना रंगला. सीएसकेचा संघ आधीच स्पर्धेतून बाहेर पडला असताना, प्लेऑफच्या दृष्टिकोनातून हा सामना जिंकणे दिल्लीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. मात्र या सामन्यापूर्वीच दिल्लीला मोठा धक्का बसला. संघाचा एक सर्वोत्तम खेळाडू सामन्यातून बाहेर पडल्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

दिल्ली कॅपिटल्सला मोठा धक्का

दिल्ली कॅपिटल्सचा (DC) सलामीवीर फलंदाज पृथ्वी शॉ याला रविवारी तीव्र तापामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, परंतु त्याची कोविड-19 टेस्ट निगेटिव्ह आली आहे. पृथ्वी संघाच्या शेवटच्या सामन्यातही खेळला नव्हता. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) एका सूत्राने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, "पृथ्वी सध्या मुंबईतील रुग्णालयात उपचार घेत आहे."

कोविड चाचणी निगेटिव्ह

'उच्च तापामुळे त्याला रुग्णालयात दाखल करावे लागले पण त्यांची आरटी-पीसीआर चाचणी निगेटिव्ह आली आहे. ज्या हॉस्पिटलमध्ये त्याला दाखल करण्यात आले आहे ते कोविड रूग्णांसाठी नियुक्त हॉस्पिटल नाही.'' पृथ्वीने इन्स्टाग्राम पोस्टमध्ये हॉस्पिटलमधून बरे झाल्याची माहितीही दिली.

'लवकरच परत येईल'

पृथ्वी शॉने लिहिले की, 'रुग्णालयात दाखल केले आहे आणि तापातून बरा होत आहे. शुभेच्छांबद्दल सर्वांचे आभार. लवकरच परत येईल.'' याआधी रविवारी चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या सामन्यापूर्वी नेट बॉलर कोविड-19 पॉझिटिव्ह आढळल्याने दिल्लीचे खेळाडू क्वारंटाईन होते.