मुंबई : रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सला आयपीएलच्या 15 व्या मोसमात (IPL 2022) सलग 8 सामन्यांत पराभवाला सामोरे जावे लागले. रोहित शर्मा स्वतः खराब फॉर्मशी झगडत आहे. रोहितला नीट कर्णधारपदाची जबाबदारीही सांभालता आली नाही. अशा परिस्थितीत मुंबई इंडियन्सकडे कर्णधारपदाची जबाबदारी घेऊ शकतो, असा खेळाडू आहे. (ipl 2022 mi mumbai indians rohit sharma sky suryakumar yadav captaincy)
आयपीएलच्या 15 व्या हंगामात मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) 8 सामने गमावले आहेत. मुंबई प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर आहे. पुढील सत्रासाठी रोहित शर्माच्या जागी सूर्यकुमार यादवला (SuryaKumar Yadav) कर्णधार बनवले जाऊ शकते.
रोहित शर्मा तिन्ही फॉरमॅटमध्ये भारताचा कर्णधार आहे. अशा स्थितीत रोहितवर अधिक ताण आहे. त्यामुळे सूर्यकुमारला नेतृत्वाची धुरा देऊन रोहितला जबाबदारीतून मुक्त केलं जाऊ शकतं.
मुंबई इंडियन्सने सूर्यकुमार यादवला मेगा ऑक्शनपूर्वीच कायम ठेवलं होते. सूर्यकुमारला कॅप्टन केल्यास तो ही जबाबदारी दीर्घकाळ सांभाळू शकेल. IPL 2022 च्या 6 सामन्यांमध्ये, सूर्यकुमार यादवने 151.26 च्या स्ट्राइक रेटने 47.80 च्या सरासरीने 239 धावा केल्या आहेत.