RR vs GT : राजस्थान रॉयल्सने (rajasthan royals) गुजरात टायटन्सचा (gujarat titans) आयपीएल 2023 च्या (IPL 2023) रविवारच्या सामन्यात तीन विकेट राखून पराभव केला आहे. गुजरात टायटन्सनेचे 177 धावांचे आव्हान राजस्थान रॉयल्सने चार चेंडू राखून पूर्ण केले. राजस्थान रॉयल्सकडून कर्णधार संजू सॅमसनने (sanju samson) सर्वाधिक 60 धावा केल्या तर शिमरॉन हेटमायर (Shimron Hetmyer) 56 धावा करून नाबाद राहिला. गुजरातकडून मोहम्मद शमीने (mohammed shami) सर्वाधिक तीन बळी घेतले. दुसरीकडे या सामन्याच्या पहिल्याच षटकात राजस्थान रॉयल्सच्या एक मोठी घोडचूक केली होती. मात्र त्यामध्ये त्यांना एक विकेटदेखील मिळाली. यामध्ये राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनचाही सहभाग होता.
नेमकं काय घडलं?
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियअमवर खेळवल्या गेलेल्या या रोमांचक सामन्यात ट्रेंट बोल्टच्या पहिल्याच षटकात हा प्रकार घडला होता. राजस्थानने नाणेफेक जिंकून आधी गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर गुजरातकडून वृद्धिमान साहा आणि शुभमन गिल फलंदाजीसाठी आले. राजस्थानकडून ट्रेंट बोल्टने (Trent Boult) गोलंदाजीस सुरुवात केली. बोल्टच्या दुसऱ्या चेंडूवर साहाने चौकार मारला. बोल्टचा पुढचा चेंडू मिडल आणि लेग स्टंपवर फुल लेंन्थ होता. साहाला तो स्क्वेअर लेगवर खेळायचा होते. पण साहा हा शॉट आधीच खेळून बसला. चेंडू त्याच्या बॅटवर आदळल्यावर साहा तिथेच उभा राहिला.
त्यानंतर चेंडूचा झेल घेण्यासाठी राजस्थानच्या खेळाडूंची धावपळ सुरु झाली. स्टॅम्पच्या मागून संजू सॅमसन धावू आला. तर शिमरॉन हेटमायर स्क्वेअर लेगमधून आला ध्रुव जुरेल पॉईंटवरून धावत आला. कोणीही मागे हटायला तयार नव्हते. तिघेही झेल घेण्यासाठी धावत होते. सॅमसनच्या हातात चेंडू आला पण हेटमायरला धडकल्यामुळे ग्लोव्हजमधून तो उडाला. तेव्हा तो चेंडू टाकणाऱ्याच झेल घेतला. हा सर्व प्रकार होत असतानाच बोल्ट तिथेच बाजूला उभा होता. मात्र त्याने हा प्रकार पाहून त्याने झेल घेण्याचे ठरवले आणि साहाला बाद केले.
players converge for the catch
th player takes it
Safe to say that was one eventful way to scalp the first wicket from @rajasthanroyals!
Follow the match https://t.co/nvoo5Sl96y #TATAIPL | #GTvRR pic.twitter.com/MwfpztoIZf
— IndianPremierLeague (@IPL) April 16, 2023
दरम्यान, प्रथम फलंदाजी करताना गुजरात टायटन्सने 20 षटकांत 7 गडी गमावून 177 धावा केल्या. गुजरातने दिलेल्या 178 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्सची सुरुवात खराब झाली. संघाने तीन षटकांत दोन्ही सलामीवीरांच्या विकेट्स गमावल्या. संजू सॅमसनने शिमरॉन हेटमायरसोबत पाचव्या विकेटसाठी 50 हून अधिक धावांची भागीदारी करून संघाला विजयाच्या जवळ पोहोचण्यास मदत केली. कर्णधार संजू सॅमसन 32 चेंडूत 60 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. संजूने आपल्या खेळीत 6 षटकार आणि 3 चौकार लगावले. ध्रुव जुरेलने 18 धावा केल्या. यानंतर अश्विन तीन चेंडूत 10 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. हेटमायरने एका टोकाकडून फलंदाजी सुरू ठेवली आणि अखेरच्या षटकात षटकार मारून संघाला विजय मिळवून दिला.