'30-35 कोटींहुन अधिकची बोली लागेल... '; हरभजन सिंहच्या मते 'या' खेळाडूवर पडेल पैशांचा पाऊस

IPL 2025 Mega Auction : आयपीएल गवर्निंग काउंसिलकडून आयपीएल 2025 साठी एकूण 8 नियमांची घोषणा करण्यात आली आहे.  यानुसार प्रत्येक फ्रेंचायझी त्यांच्या टीममधील केवळ 6 खेळाडूंना रिटेन करू शकणार आहे. 

पुजा पवार | Updated: Oct 2, 2024, 07:23 PM IST
'30-35 कोटींहुन अधिकची बोली लागेल... '; हरभजन सिंहच्या मते 'या' खेळाडूवर पडेल पैशांचा पाऊस  title=
(Photo Credit : Social Media)

Harbhajan Singh IPL 2025 Mega Auction : इंडियन प्रीमियर लीगच्या 18 व्या सीजन पूर्वी मेगा ऑक्शन पार पडणार आहे.  यासाठी आयपीएल गवर्निंग काउंसिलकडून आयपीएल 2025 साठी एकूण 8 नियमांची घोषणा करण्यात आली आहे.  यानुसार प्रत्येक फ्रेंचायझी त्यांच्या टीममधील केवळ 6 खेळाडूंना रिटेन करू शकणार आहे. मिचेल स्टार्क हा आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला होता. आयपीएल 2024 साठी कोलकाता नाईट राइडर्सने 24.75 कोटी रुपये मोजून त्याला आपल्या संघात घेतले होते. भारताचा माजी गोलंदाज हरभजन सिंहने मोठा दावा केला आहे की जर जसप्रीत बुमराह ऑक्शनसाठी उपलब्ध झाला तर त्याला संघात घेण्यासाठी फ्रेंचायझी 30 कोटींहून अधिकची बोली लावू शकतात. 

बुमराहला अगदी सहज 30-35 कोटी मिळतील : 

2013 या वर्षात जसप्रीत बुमराहने मुंबई इंडियन्सकडून आयपीएलमध्ये डेब्यू केले होते.  पाच वेळा आयपीएल चॅम्पियन राहिलेल्या मुंबई इंडियन्समध्ये बुमराहने एकूण 133 सामने खेळले असून यात 165 विकेट घेतले आहेत. हरभजन सिंहने बुमराह विषयी एक डाव करत सोशल मीडिया एक्स अकाउंटवर लिहिले की, 'जर जसप्रीत बुमराहने स्वतःला ऑक्शनमध्ये ठेवले तर तो आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महाग खेळाडू ठरू शकतो. तुम्ही माझ्याशी सहमत असाल. हरभजनने पुढे लिहिले की, 'माझ्या मते, बुमराहला दरवर्षी 30-35 कोटींहून अधिक रुपये सहज मिळतील. सर्व 10 आयपीएल संघ ऑक्शनमध्ये त्याच्यासाठी बोली लावतील आणि लढतील'.

हेही वाचा : धोनीला भेटण्यासाठी 1200 किलोमीटरचा सायकल प्रवास, 7 दिवस टेंटमध्ये राहिला, पण थालाने ढुंकूनही पाहिलं नाही

 

रिटेन करण्यासाठी 31 ऑक्टोबर 2024 पर्यंत मुदत : 

फ्रेंचायझींकडे आयपीएल 2025 ऑक्शनपूर्वी खेळाडूंना रिटेन करण्यासाठी 31 ऑक्टोबर 2024 पर्यंत मुदत देण्यात आली आहे. प्रत्येक फ्रेंचायझीला 31 ऑक्टोबर च्या सायंकाळी 5 वाजेपर्यंत रिटेन खेळाडूंची यादी जाहीर करावी लागेल.  आयपीएल 2025 च्या मेगा ऑक्शनपूर्वी, सर्व संघ जास्तीत जास्त सहा खेळाडू रिटेन करू शकतात. जर संघानी सह खेळाडूंना रिटेन केले तर ते राईट टू मॅच म्हणजेच RTM कार्ड वापरू शकत नाहीत. याचा अर्थ, आयपीएल फ्रेंचायझी जितके कमी खेळाडू रिटेन करेल तितके जास्त राईट टू मॅच कार्ड्स त्यांच्याकडे असतील, जे ते ऑक्शनमध्ये वापरू शकतात. 

आयपीएल 2023 पासून जिओ सिनेमाकडे आयपीएलच्या डिजिटल लाईव्ह स्ट्रीमिंगचे राईट्स आहेत. जिओ सिनेमाने मुंबई इंडियन्स सह इतर फ्रेंचायझी कोणत्या खेळाडूंना रिटेन करू शकतात याचा अंदाज व्यक्त केला आहे. यात जिओ सिनेमानुसार मुंबई इंडियन्स रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, जसप्रीत बुमराह, तिलक शर्मा किंवा ईशान किशन या खेळाडूंना रिटेन करू शकते. मुंबई इंडियन्सकडे जसप्रीत बुमराह वगळता रिटेन करण्यासाठी इतर कोणी मजबूत बॉलिंग पर्याय नाही. त्यामुळे मुंबई इंडियन्स बुमराहला मेगा ऑक्शनपूर्वी रिटेन करणार हे जवळपास निश्चित आहे.