T20 World Cup 2022: जसप्रीत बुमराहला राग अनावर, टीकाकारांना दिलं कडक उत्तर, पोस्ट करत म्हणाला...

जसप्रीत बुमराह एवढा कशाचा आला राग?

Updated: Oct 7, 2022, 12:09 AM IST
T20 World Cup 2022: जसप्रीत बुमराहला राग अनावर, टीकाकारांना दिलं कडक उत्तर, पोस्ट करत म्हणाला... title=

Jasprit Bumrah : जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे T20 World Cup 2022 मधून बाहेर पडला आहे (Jasprit Bumrah Out From T20 World Cup). याच कारणामुळे त्यांना टीकेलाही बळी पडावं लागलं. बुमराह फक्त आयपीएलमध्ये खेळतो, टीम इंडियासाठी नाही, असंही म्हटलं जात होतं. पण आता बुमराहने इंस्टाग्राम स्टोरीमध्ये शेअर करत (jasprit Bumrah to critics) टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिलं आहे.

Jasprit Bumrah स्टोरीमध्ये काय म्हटला?

बुमराहने त्याच्या इन्टाग्राम स्टोरीमध्ये (jasprit Bumrah on instagram) एक पोस्ट शेअर करत टीकाकारांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय. जर तुम्ही तुमच्या ध्येयाच्या रस्त्यात येणाऱ्या कुत्र्यांना दगड मारत बसले तर तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत कधीही पोहचू शकत नाही, असा मथळा असलेला एक फोटो बुमराहने शेअर केला. या पोस्टच्या माध्यमातून बुमराहने त्याच्यावर होणाऱ्या टीकेला उत्तर दिलंय.

दुखापतीमुळे बुमराह दक्षिण आफ्रिका मालिका आणि T20 विश्वचषकातून बाहेर पडला आहे. बुमराह टी-20 विश्वचषकातून बाहेर पडल्याने त्याच्यावर टीका झाली होती. गेल्या काही काळापासून तो दुखापतीशी झुंजताना दिसत आहे. दुखापतीमुळे तो 2022 च्या आशिया कपमध्येही सहभागी होऊ शकला नाही. त्यामुळे फॅन्स त्याच्यावर संतापल्याचं दिसून आलं होतं.

Jasprit Bumrah

दरम्यान, बुमराहने (jasprit Bumrah t20 career) भारतासाठी 60 T20 सामन्यात 70 विकेट घेतल्या आहेत. त्यामुळे भारताचा मोठा धक्का बसल्याचं म्हटलं जातंय. बुमराहच्या जागी दीपक चहर किंवा मोहम्मद शमी संघात सामील होण्याची शक्यता आहे.

आणखी वाचा - Ball Boy Video: सिराजपेक्षा 'बॉल बॉय' भारी! काय अप्रतिम कॅच पकडलाय बघा...