Jasprit Bumrah: ज्याची प्रतिक्षा होती, तो क्षण आला... Video शेअर करत बुमराहने दिली गुड न्यूज!

Jasprit Bumrah Viral Video: बुमराहने सप्टेंबर 2022 नंतर एकही सामना खेळलेला नाही. सततच्या दुखापतीमुळे बुमराह संघाबाहेर होता, त्यानंतर त्याला सर्जरीला (Jasprit Bumrah Comeback) सामोरं जावं लागलं.

Updated: Jul 18, 2023, 02:50 PM IST
Jasprit Bumrah: ज्याची प्रतिक्षा होती, तो क्षण आला... Video शेअर करत बुमराहने दिली गुड न्यूज! title=
Jasprit Bumrah shared a video on Instagram

Jasprit Bumrah shared a video on Instagram: टीम इंडियाचा यॉर्कर स्पेशलिस्ट जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) गेल्या दीड वर्षापासून संघाबाहेर आहे. समोरचा संघ कोणताही असो, बुमराह दांडकं मोडायचाच. आपल्या या अप्रतिम खेळीमुळे त्याला सतत क्रीडाप्रेमींची दाद मिळवली. त्याच्या वाईट काळात देखील त्याच्या फॅन्सने त्याला सोशल मीडियावरून खुप सपोर्ट केला आहे. अशातच आता बुमराहने चाहत्यांना  खुशखबर दिली आहे. बुमराहने नुकताच एक व्हिडीओ (Viral Video) शेअर केला आहे.

बुमराहने सप्टेंबर 2022 नंतर एकही सामना खेळलेला नाही. सततच्या दुखापतीमुळे बुमराह संघाबाहेर होता, त्यानंतर त्याला सर्जरीला (Jasprit Bumrah Comeback) सामोरं जावं लागलं. टीम इंडियाचा ट्रम्प कार्ड मानला जाणारा बुमराह कमबॅक करणार तरी कधी? असा सवाल विचारला जात होता. अशातच बुमराहने त्याच्या इन्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे.

बुमराहने हा व्हिडीओ (Jasprit Bumrah Instagram) शेअर करत टीम इंडियाच्या ऑफिशिअल अकाऊंटला टॅग केलं आहे. हा व्हिडीओ बेंगळुरू येथील एनसीएमधील असल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये बुमराह गोलंदाजी करताना दिसतोय. यावेळी बुमराहच्या चेहऱ्यावरचं हास्य त्याच्या चाहत्यांसाठी एक सुखद अनुभव होता. आय एम कमिंग होम…! असं गाणं बॅकग्राऊंडमध्ये वाजत असल्याचं दिसतंय.

पाहा Video

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by jasprit bumrah (@jaspritb1)

दरम्यान, जसप्रीत बुमराह म्हणजे टीम इंडियाचा स्टार गोलंदाज. मागील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप असो वा टी-ट्वेंटी वर्ल्ड कप बुमराहची जागा कधीही भरून निघाली नाही. ऋषभ पंत, श्रेयस अय्यर, केएल राहुल, उमेश यादव यांच्यासह अनेक खेळाडू देखील एनसीएमध्ये प्रशिक्षण घेत आहेत. पाकिस्तानविरुद्ध बुमराह खेळू शकेल का? असा सवाल आता उपस्थित होताना दिसतोय.