मुंबई : गेल्या काही वर्षांपासून मोठ-मोठ्या स्पर्धेत विजय मिळविणाऱ्या भारतीय अंध क्रिकेट टीम आणि भारतीय दृष्टीहीन क्रिकेट संघ क्रिकेट एसोसिएशन फॉर द ब्लाइंड इन इंडिया- CABI)अजूनही बीसीसीआयने मान्यता दिलेली नाही. बोर्डाच्या या वागणुकीमुळे नाराज होऊन CABIचे महासचिव जॉन डेव्हिड यांनी विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखालील टीम इंडियाला डोळ्याला पट्टी बांधून ब्लाइंड क्रिकेट खेळण्याचे थेट चॅलेंज दिले आहे.
एका न्यूज पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत डेव्हिड म्हणाले, विराट कोहलीच्या टीमला डोळ्यांना पट्टी बाधून खेळायला पाहिजे. तेव्हा आम्हांला काय अडचणींचा सामना करावा लागतो हे त्यांना समजून येईल.
डेव्हिड म्हणाले, त्यांना आमच्यासोबत एक डेमो मॅच खेळायला हवे. यात नॅशनल टीमचे खेळाडू डोळ्याला पट्टी बांधून उतरतील. या संदर्भात तथ्य असे आहे की अनेक वर्षांपासून भारतीय दृष्टीहीन क्रिकेट संघटनेला मान्यता देण्याची मागणी केली जात आहे.
दरम्यान मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने CoA ला एक पत्र पाठवून बीसीसीआयला विनंती केली होती. त्यात ब्लाइंड एसोसिएशनला आपल्या अख्यारीत घेऊन त्यांना पेन्शन स्कीममध्ये सामील करून घ्यावे असेही म्हटले होते.
भारतीय ब्लाइंड क्रिकेट टीमने २० जानेवारीला पाकिस्तानला नमवून ब्लाइंड क्रिकेट वर्ल्ड कप जिंकला. या शिवाय भारतीय टीमने दोन टी-२० वर्ल्ड कप, दोन एशिया कप आणि चार द्विपक्षीय सिरीज जिंकले आहेत. पण अजून या टीमला बीसीसीआयने मान्यता दिलेली नाही.