दुसऱ्या टेस्टआधी कोहलीची डोकेदुखी वाढणार

श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टला ३ ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे.

Updated: Aug 1, 2017, 06:03 PM IST
दुसऱ्या टेस्टआधी कोहलीची डोकेदुखी वाढणार  title=

कोलंबो : श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टला ३ ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. पण या टेस्टआधी कॅप्टन विराट कोहलीची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. दुसऱ्या टेस्टआधी सराव करण्यासाठी के.एल.राहुल मैदानात उतरला होता.

ताप आल्यामुळे राहुल हा पहिल्या टेस्टला मुकला होता. त्याच्याऐवजी अभिनव मुकुंदला संधी देण्यात आली होती. मुकुंदनं या टेस्ट मॅचच्या दुसऱ्या इनिंगमध्ये ८१ रन्स केल्या होत्या तर मुकुंदबरोबर ओपनिंग करणाऱ्या शिखर धवननं पहिल्या इनिंगमध्ये १९० रन्सची खेळी केली होती.

मुकुंद आणि धवननं पहिल्या टेस्टमध्ये चांगली कामगिरी केल्यामुळे राहुलला संधी द्यायची असेल तर कोणाला काढायचं हा प्रश्न विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्रीला सतावणार आहे. तीन टेस्ट मॅचच्या या सीरिजमध्ये भारतानं पहिली टेस्ट तब्बल ३०४ रन्सनं जिंकून १-०नं आघाडी घेतली आहे.