IPL 2024, CSK vs GT : महेंद्रसिंग धोनीला इम्प्रेस करणं येड्या गबाळ्याचं काम नाही. फार कमी खेळाडूंनी धोनीला (MS Dhoni) चकीत करून सोडलंय. त्यानंतर त्यांना टीम इंडियामध्ये संधी देखील मिळाली. अशातच आता चेन्नई सुपर किंग्जच्या (CSK) एका खेळाडूने असं काही केलंय की, धोनीने देखील भूवया उंचावल्या. होय, आयपीएलच्या डेब्यू सामन्यात पहिल्या बॉलचा सामना करताना चेन्नईचा युवा फलंदाज समीर रिझवी (Sameer Rizvi) याने राशीद खानच्या (Rashid Khan) बॉलिंगवर खणखणीत सिक्स मारला अन् कुटूंबाला दिलेलं वचन पूर्ण केलं. समीर रिझवीने सिक्स मारल्यावर त्याच्या कुटूंबाची प्रतिक्रिया समोर आली आहे.
समीर रिझवीचा सिक्स पाहून धोनीच्या चेहऱ्यावर देखील हसू फुटलं. धोनीच्या चेहऱ्यावर आनंद पाहून सर्वांना आश्चर्य वाटलं होतं. धोनीने आता जाताजाता चेन्नईला एक फिनिशर दिलाय, अशी चर्चा होताना दिसत आहे. समीर रिझवीचा भाऊ सबूल रिझवी याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आणि सांगितलं की, समीरने घरी सांगितलं होतं की पहिल्या चेंडूवर षटकार मारणार, आता समीरने पदार्पणाच्या सामन्यात षटकार मारला आहे. माशाल्लाह...! असं समीर रिझवीने म्हटलं आहे.
कोण आहे समीर रिझवी?
मागील आयपीएलच्या मिनी लिलिवात उत्तर प्रदेशकडून खेळणाऱ्या समीर रिझवीवर चेन्नई सुपर किंग्जने डाव टाकला. फक्त 20 लाख किंमत बेस प्राईस असणाऱ्या रिझवीला चेन्नईने 8.4 कोटी किंमत मोजत संघात सामील करून घेतलं. गुजरात आणि दिल्लीने टफ फाईट दिल्याने रिझवीची किंमत हाय गेली. अखेर चेन्नईने रिझवीला ताफ्यात सामील करून घेतलं. समीर रिझवी हा यूपीकडून देशांतर्गत क्रिकेट खेळतो. 20 वर्षीय फलंदाजाने यूपी टी-20 लीगमध्ये कानपूर सुपरस्टार्ससाठी सर्वाधिक षटकार ठोकले होते. युवा युवराज सिंह अशी त्याची ओळख निर्माण झाली होती. त्याने यूपी लीगमध्ये दोन शतके झळकावली आणि स्पर्धेतील केवळ 9 डावात 455 धावा केल्या. रिझवी यूपी लीगमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता, त्यामुळे चेन्नईने त्याला संघात सामील करून घेतलं होतं.
चेन्नई सुपर किंग्जचा संघ - ऋतुराज गायकवाड (C), रचिन रवींद्र, अजिंक्य रहाणे, डॅरिल मिशेल, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, समीर रिझवी, एमएस धोनी (विकेटकीपर), दीपक चहर, तुषार देशपांडे, मुस्तफिजुर रहमान. मथीशा पाथीराना, शार्दुल ठाकूर, शेख रशीद, निशांत सिंधू, मिचेल सँटनर, महेश थेक्षाना, मोईन अली, अजय जाधव मंडल, प्रशांत सोलंकी, मुकेश चौधरी, सिमरजीत सिंग, आरएस हंगरगेकर, अरावेली अवनीश.