मुंबई : आयपीएलच्या ११ व्या हंगामाची रेलचेल आता सुरु झाली आहे. प्रत्येक संघमालक आपल्या टीममध्ये कोणते खेळाडू खेळणार, कोणते बसणार याच्या तयारीला लागले आहेत.
१० हंगामातील खेळाडूंची खरेदी, त्यांचा आयपीएलमधला तसेच सध्याचा खेळ यावरुन ठोकताळे बांधण्यात येत आहेत. दरम्यान मुंबई इंडियन्स संघाने वेगवान बॉलर लसिथ मलिंगाला बाहेरचा रस्ता दाखविल्याचे वृत्त आहे. 'क्रिकेट एज' या वृत्तसंस्थेने यासंबंधीचे वृत्त दिले आहे.
प्रत्येक संघमालक हा आपल्या टीममध्ये ३ खेळाडूंनाच कायम ठेवू शकतो. त्यामूळे लसिथ मलिंगाला या तिघांमध्ये स्थान द्यायचे का ? याबाबत मुंबई इंडियन्स सघांची खेळ कमिटी निर्णय घेणार आहे.
लसिथ मलिंगाचे वाढते वय आणि सतत होणाऱ्या दुखापतींचा खेळावर परिणाम होताना दिसतो. त्यामूळे मुंबई इंडियन्स मलिंगासाठी उत्सुक नसल्याचे दिसून येत आहे.
लसिथ मलिंगाला पुन्हा लिलावात उतरवून गरजेनुसार त्याला खरेदी करण्याचा पर्याय मुंबई इंडियन्सच्या प्रशासनाने राखून ठेवणार असल्याचे सांगण्यात येत आहे.