Sikandar Shaikh 2023 : माझ्यावर अन्याय झाला म्हणत टांग डावाबाबत सिकंदरने उपस्थित केले 'हे' गंभीर प्रश्न!

Maharashtra Kesari 2023 : सिकंदर हरल्यावर कुस्तीगीर, कुस्ती शौकिन आणि नेटकरी त्याच्या समर्थनार्थ उभे राहताना दिसत आहेत. पंचानी महेंद्र गायकवाड याला दिलेले 4 गुण हे योग्य नसल्याचं म्हटलं जात आहे. अशातच यावर खुद्द सिकंदर शेखने आपलं मत मांडताना त्याच्यावर अन्याय झाल्याचं सांगितलं आहे.

Updated: Jan 16, 2023, 07:58 PM IST
Sikandar Shaikh 2023 : माझ्यावर अन्याय झाला म्हणत टांग डावाबाबत सिकंदरने उपस्थित केले 'हे' गंभीर प्रश्न! title=

Maharashtra Kesari 2023 : महाराष्ट्र केसरी 2023 स्पर्धेमधील सेमी फायनल लढतीमध्ये सिकंदर शेख आणि महेंद्र गायकवाड यांच्यात झालेल्या कुस्तीत पंचांनी दिलेला निर्णय वादग्रस्त ठरताना दिसत आहे. सिकंदर हरल्यावर कुस्तीगीर, कुस्ती शौकिन आणि नेटकरी त्याच्या समर्थनार्थ उभे राहताना दिसत आहेत. पंचानी महेंद्र गायकवाड याला दिलेले 4 गुण हे योग्य नसल्याचं म्हटलं जात आहे. अशातच यावर खुद्द सिकंदर शेखने आपलं मत मांडताना त्याच्यावर अन्याय झाल्याचं सांगितलं आहे. 

काय म्हणाला सिकंदर?  
महेंद्र गायकवाडने टांग मारली ती पूर्ण परफेक्ट बसली नाही. मी एका खांद्यावर पडलो मात्र माझा त्याच्यावर कब्जा होता. अशा प्रकारे महेंद्रला 2 गुण आणि मला 1 गुण द्यायला हवा होता. परफेक्ट टांग म्हणजे 4 गुण हवे असतील तर मी पूर्ण पाठीवर पडायला हवं होते. मात्र तसं झालं नाही त्याला 4 गुण दिले म्हणजे चुकीचं झालं आहे. माझ्या कोचने चॅलेंज केल्यावर ते सक्सेस झाल्यावरही 4 गुण का दिले त्यानंतर माझ्या कोचला तिथून हाकलून लावण्यात आलं. फ्रंटच्या बाजूचा कॅमेरा का दाखवला? बॅक साईडचा कॅमेरा का दाखवण्यात आला? असे सवाल सिकंदरने उपस्थित केले आहेत. 

यंदाच्या महाराष्ट्र केसरीसाठी मी पूर्ण तयारीने गेलो होतो. नक्कीच महाराष्ट्र केसरीची गदा पटकावली असती. मात्र जे काही घडलं हे माझ्यासोबतच नाहीतर इतरांसोबत नाही झालं पाहिजे. मी गेले दोन दिवस नाराज होतो मात्र त्यामुळे फोन उचलले नव्हते. आज मी सर्वांचे फोन उचलले असून संवाद साधला आहे. पुढच्या वर्षीच्या महाराष्ट्र केसरीसाठी मी पूर्ण तयारीने उतरणार असल्याचं सिकंदरने सांगितलं. 

दरम्यान, माझ्याच तालमीतील मल्लांसोबत कुस्ती झाली, यामध्ये पहिली कुस्ती माऊली जमदाडे आणि प्रकाश बनकरसोबत झाली. त्यामुळे आमच्या तालमीतून मी एकटाच वरती आलो होतो त्यामुळे सर्वांची इच्छा होती की मी महाराष्ट्र केसरी व्हावं मात्र तसं काही झालं नसल्याचं सांगत सिकंदरने मनातील खंत बोलून दाखवली. या वर्षी झालं ते झालं पुढच्या वर्षी मी महाराष्ट्र केसरीची गदा आणून दाखवेल असा इरादाही त्याने बोलून दाखवला.