कोणालाही न सांगता, हळूच युपी वॉरियर्सच्या महिला टीममध्ये का घुसला Mitchell Starc?

ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीमचा महान वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने यावर्षी होणाऱ्या द हंड्रेड लीगमधून त्याचं नाव मागे घेतलं आहे. द हंड्रेड ड्राफ्टच्या नोंदणीपूर्वीच स्टार्कने त्याचं नाव मागे घेण्याचा निर्णय घेतला.

Updated: Mar 24, 2023, 07:26 PM IST
कोणालाही न सांगता, हळूच युपी वॉरियर्सच्या महिला टीममध्ये का घुसला  Mitchell Starc? title=

Mitchell Starc: आज महिला प्रिमीयर लीगमध्ये (WPL 2023) मुंबई इंडियन्स विरूद्ध युपी वॉरियर्स यांच्यात सामना रंगणार आहे. दरम्यान ऑस्ट्रेलिया महिला टीमची विकेटकीपर एलिसा हीली (Alyssa Healy) युपीच्या टीमची कर्णधार आहे. एलिसाचा आज वाढदिवस असून तिच्या पतीने तिला मोठं सरप्राईज दिलं आहे. एलिसाचा पती दुसरा तिसरा कोणीही नसून ऑस्ट्रेलियन टीमचा गोलंदाज मिचेल स्टार्क (Mitchell Starc) आहे. 

एलिसाने तिचा 33 वा वाढदिवस युपी वॉरियर्सच्या टीमसोबत साजरा केला. यामध्ये तिला सरप्राईज देण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज मिचेल स्टार्कपण तिच्या या आनंदाच्या क्षणांमध्ये सहभागी झाला. भारताविरूद्धच्या सामन्यांनंतर एलिसाला सरप्राईज देण्यासाठी मिचेल युपी वॉरियर्सच्या कॅम्पमध्ये पोहोचला होता. 

ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट टीम आणि युपी वॉरिसयर्सची कर्णधार Alyssa Healy आज तिचा 33 वा वाढदिवस साजरा करतेय. यावेळी एलिसाने युपी वॉरियर्सच्या टीमसोबत केक कापला. तर यावेळी पत्नीला सरप्राईज म्हणून मिचेल थेट युपी वॉरियर्सच्या टीममध्ये जाऊन पोहोचला. यावेळी त्याने एलिसाच्या चेहऱ्याला केक देखील लावला आहे. 

एलिसा हिलीने आतापर्यंत डब्ल्यूपीएलमध्ये चांगली कामगिरी आहे. डब्ल्यूपीएलमध्ये सर्वाधिक रन्स करण्याच्या बाबतीत ती पाचव्या क्रमांकावर आहे. तिने आतापर्यंत या लीगमध्येचे एकूण 8 सामने खेळले असून एलिसाने एकूण 242 रन्स केलेत. यावेली तिने 8 ही डावांमध्ये फलंदाजी केली. 

युपी टीमची खेळाडू लॉरेन बेल (Lauren Bell) ने एलिसाच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. ज्यामध्ये स्टार्क तिच्या चेहऱ्यावर केक लावताना दिसतोय. 

मिचेल स्टार्कने लीगमधून नाव घेतलं मागे

ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीमचा महान वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने यावर्षी होणाऱ्या द हंड्रेड लीगमधून त्याचं नाव मागे घेतलं आहे. द हंड्रेड ड्राफ्टच्या नोंदणीपूर्वीच स्टार्कने त्याचं नाव मागे घेण्याचा निर्णय घेतला. दरम्यान स्टार्कने नाव मागे का घेतलं याबाबत कोणतंही कारण दिलेलं नाहीये.

भारताविरूद्ध स्टार्कची उत्तम कामगिरी

नुकतंच भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये वनडे सिरीज रंगली. यामध्ये टीम इंडियाविरुद्धच्या वनडे सिरीजमधील दुसऱ्या सामन्यात स्टार्कने 5 विकेट घेतल्या होत्या. त्याच्या या उत्तम कामगिरीने ऑस्ट्रेलियाला सिरीज जिंकून दिली.