Ind vs Nz : मोहम्मद सिराजसाठी सुवर्णक्षण! अख्खं कुटूंब सामना पाहण्यासाठी मैदानात अवतरलं

Ind vs Nz :  मोहम्मद सिराजसाठी हा सामना खुप खास होता. कारण या सामन्यात सिराज त्याच्या होम ग्राऊंडवर खेळत होता. तसेच त्याचे संपुर्ण कुटूंब देखील हा सामना पाहण्यासाठी मैदानात पोहोचले होते. त्यामुळे हा क्षण सिराजसाठी खुपच सुवर्ण होता. 

Updated: Jan 19, 2023, 03:43 PM IST
Ind vs Nz : मोहम्मद सिराजसाठी सुवर्णक्षण! अख्खं कुटूंब सामना पाहण्यासाठी मैदानात अवतरलं  title=

Ind vs Nz : न्यूझीलंडविरूद्ध पहिला वनडे सामना टीम इंडियाने 12 धावांनी जिंकला होता. टीम इंडियाच्या (Team India) विजयाचा शिल्पकार मोहम्मह सिराज (Mohammed Siraj)आणि शुभमन गिल ठरला होता. मोहम्मद सिराजसाठी हा सामना खुप खास होता. कारण या सामन्यात सिराज त्याच्या होम ग्राऊंडवर खेळत होता. तसेच त्याचे संपुर्ण कुटूंब देखील हा सामना पाहण्यासाठी मैदानात पोहोचले होते. त्यामुळे हा क्षण सिराजसाठी खुपच सुवर्ण होता. आणि या सुवर्ण क्षणांचा आनंद आणखीण द्विगुणीत करण्यासाठी त्याने साजेसा खेळ देखील दाखवला होता.

होम ग्राऊंडवर भेदक गोलंदाजी

टीम इंडियाचा न्यूझीलंड (India vs New Zealand) विरूद्ध पहिला सामना हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडिअमवर खेळवला गेला. हे मैदान सिराजसाठी खुपच खास होते. कारण हे मैदान त्याचे होम ग्राउंड आहे. याच मैदानावर तो बॉलिंग टाकायला शिकला. याच मैदानातून त्याने टीम इंडियाच्या संघात दाखल होण्याचे स्वप्न बाळगले होते. त्यामुळे त्याचासाठी हा सामना खुपच खास होते.

 

हे ही वाचा :  मायकेल ब्रेसवलने टीम इंडियाच्या माजी कर्णधाराचा रेकॉर्ड मोडला, जाणून घ्या

 

कुटूंबियांची मैदानात हजेरी 

हैदराबादमधील सामना सिराजसाठी आणखीण एका कारणामुळे खास ठरला होता. कारण या सामन्यात त्याचे संपुर्ण कुटूंब सामना पाहण्यासाठी मैदानात पोहोचले होते. अख्खं कुटूंब त्याचा डोळे भरून खेळ पाहत होते. कारण ऐरवी घरी असताना टीव्हीवर त्याला पाहण्याची संधी येते. मात्र प्रथमच त्याचे कुटुंब त्याला लाईव्ह खेळताना पाहत होते. त्यामुळे आपला मुलगा,भाऊ मैदानात देशासाठी खेळताना पाहून कुटुंबियांना भरून आले होते.  

फक्त वडिल सामना पाहू शकले नाही...

सिराजचं (Mohammed Siraj)संपुर्ण कुटूंब त्याचे खेळ पाहत होते. आईपासून जवळची संपुर्ण मंडळी आली होती. यावेळी संपुर्ण स्टेडीयम सिराजला चिअर करत असल्याचे पाहून आई आणि त्याच्या बहिणी भारावून गेल्या होत्या. सिराजची आई ग्रीलची रेलिंग घट्ट धरून संपुर्ण सामना पाहत होती. तिच्या डोळ्यात अश्रू देखील तरळत होते. हा क्षण सिराजसाठी खुपच खास होता. फक्त एकच गोष्ट राहीली ती म्हणजे, सिराजचे वडिल हा क्षण पाहू शकले नाही. खरं तर सिराजच्या (Mohammed Siraj) वडिलांचे काही वर्षापूर्वीचं निधन झाले आहे.

दरम्यान न्यूझीलंड विरूद्ध सामन्यात सिराजने (Mohammed Siraj) उत्कृष्ट बॉलिंग करून टीम इंडियाला विजय मिळवून दिला होता. सिराजने 10 ओव्हरमध्ये 46 धावा देत 4 विकेट घेतल्या होत्या. खरं तर टीम इंडियाला गरज असताना सिराजने एकाच ओव्हरमध्ये 2 विकेट घेऊन सामन्याला कलाटणी देली होती. हीच कलाटणी टीम इंडियाचा विजय निश्चित करून गेली होती. आता टीम इंडियाने पहिला वनडे सामना जिंकून मालिकेत 1-0 ने आघाडी घेतलीय.