मुंबई: क्रिकेटच्या एकदिवसीय आणि टी 20 खेळावर फलंदाजांचे नेहमीच वर्चस्व राहिले आहे. फलंदाजांनी आक्रमक फलंदाजी करत गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं आहे. मैदानात धावांचा डोंगर उभा करताना षटकार, चौकारांचा वर्षावर केला जातो. क्रिकेटच्या खेळातून जगाला विराट कोहली, सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, ब्रायन लारा असे दिग्गज फलंदाज मिळाले आहेत. त्याचबरोबर ख्रिस गेल आणि युवराज सिंग सारख्या सिक्सर किंग्सने गोलंदाजांच्या मनात कायम भीती राहिली आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच 5 फलंदाजांबद्दल सांगणार आहोत ज्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार ठोकले आहेत.
1. शाहिद आफ्रिदी
एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीच्या नावावर आहे. आफ्रिदी हा जागतिक क्रिकेटमधील सर्वात घातक फलंदाजांपैकी एक गणला जातो. त्याने पाकिस्तानसाठी 369 सामन्यात 351 षटकार मारले आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या फलंदाजांमध्ये आफ्रिदी अजूनही अव्वल आहे.
2. ख्रिस गेल
या यादीत पॉवर हिटर ख्रिस गेलचे नाव दुसऱ्या क्रमांकावर आहे. ख्रिस गेलने वेस्ट इंडिजविरुद्ध 301 एकदिवसीय सामने खेळले असून ज्यामध्ये त्याने 331 षटकार मारले आहेत. यासोबतच गेलने टी-20 क्रिकेट आणि कसोटीमध्येही भरपूर षटकार मारले आहेत.
3. सनथ जयसूर्या
या यादीत श्रीलंकेचा माजी सलामीवीर डावखुरा फलंदाज सनथ जयसूर्या तिसऱ्या क्रमांकावर आहे. जयसूर्याच्या नावावर क्रिकेट विश्वात अनेक विक्रम आहेत. त्याने श्रीलंका संघासाठी 445 सामने खेळले ज्यात त्याच्या बॅटमधून 270 षटकार ठोकले आहेत.
4. रोहित शर्मा
टीम इंडियाचा सध्याचा कर्णधार रोहित शर्मा वनडेमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत चौथ्या क्रमांकावर आहे. या यादीत रोहित हा एकमेव फलंदाज आहे जो अद्याप निवृत्त झालेला नाही. रोहितने आतापर्यंत 230 सामने खेळले असून त्यात त्याने 245 षटकार मारले आहेत. रोहितने आणखी १-२ वर्षे चांगली फलंदाजी केली तर सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम त्याच्या नावावर होईल.
5. महेंद्रसिंग धोनी
षटकारांची चर्चा असेल आणि महेंद्रसिंग धोनीचे नाव नाही, असं होऊ शकत नाही. वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्यांच्या यादीत महेंद्रसिंग धोनी पाचव्या क्रमांकावर आहे. त्याने टीम इंडियासाठी 350 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 229 षटकार मारले आहेत. धोनीला जगातील सर्वोत्तम फिनिशर मानले जात होते.