बंगळुरु : चेन्नई विरुद्ध बंगळुरु यांच्यात 21 एप्रिलला चुरशीचा सामना झाला. यात बंगळुरुने चेन्नईचा शेवटच्या बॉलवर 1 रनने पराभव केला. चेन्नईच्या विजयासाठी धोनीने अखेरच्या बॉलपर्यंत प्रयत्न केले. परंतु धोनीला चेन्नईला विजय मिळवून देता आला नाही. असे असले तरी धोनीने आपल्या खेळीने आयपीएलमध्ये 4 हजार रनचा टप्पा पूर्ण केला. विशेष म्हणजे धोनीने हे 4 हजार रन, एक कॅप्टन म्हणून पूर्ण केले आहेत. याआधी आयपीएलमध्ये 4 हजार रनचा टप्पा सुरेश रैना, विराट कोहली आणि रोहित शर्मा या भारतीय खेळाडूंनी पूर्ण केला आहे. पंरतु त्यांनी हे रन एका खेळाडूच्या रुपात केले आहेत.
And a lovely match for a yellovely record! #WhistlePodu #Yellove #RCBvCSK pic.twitter.com/zJ2DExNBP2
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) April 21, 2019
धोनीने बंगळुरु विरुद्ध 48 बॉलमध्ये नाबाद 84 रनची खेळी केली. यामध्ये त्याने 7 सिक्स आणि 5 फोर लगावले. धोनीने 44 रन करताच 4 हजार रन पूर्ण करण्याचा रेकॉर्ड केला. चेन्नईने खेळलेल्या एकूण 10 मॅचपैकी 7 मॅचमध्ये विजय मिळवला आहे. चेन्नई पराभवानंतर देखील 14 पॉईंटसह अग्रस्थानी कायम आहे.
दरम्यान चेन्नईला विजयासाठी शेवटच्या ओव्हरमध्ये 26 रनची गरज होती. मात्र चेन्नईला 24 रनच करता आल्या. शेवटच्या ओव्हरमध्ये मैदानात चेन्नईचा कॅप्टन धोनी आणि शार्दूल ठाकूर उपस्थित होते. धोनी मैदानात असताना आपली टीम पराभूत होणार नाही, असा विश्वास चेन्नईच्या चाहत्यांना होता. धोनीने तो विश्वास 5 व्या बॉलपर्यंत कायम ठेवला. बंगळुरुकडून शेवटची ओव्हर उमेश यादव टाकत होता.
चेन्नईला विजयासाठी शेवटच्या ओव्हरमध्ये 26 रनची गरज होती. धोनीने उमेश यादवच्या ओव्हरमधील पहिल्या 5 बॉलमध्ये 24 रन काढल्या. धोनीने अनुक्रमे 4, 6, 6, 2 आणि 6 रन काढल्या. धोनीच्या अशा प्रकारच्या फटकेबाजीमुळे विजयासाठी अखेरच्या बॉलवर अवघ्या 2 रनची आवश्यकता होती. पंरतु यादवने टाकलेला स्लोअर बॉल धोनीला मारता आला नाही.
धोनीकडून मिस झालेल्या बॉलवर चोरटी रन काढण्याच्या प्रयत्नात नॉन स्ट्राईकवर असलेल्या, शार्दूल ठाकूरला स्ट्राईक एंडवर विकेटकीपर पार्थिव पटेलने सराईतपणे रन आऊट केले, आणि बंगळुरुने चेन्नईचा केवळ 1 रनने निसटता पराभव झाला.