MS Dhoni : 'नवी भूमिका...', चेन्नईचा थाला कॅप्टन्सी सोडणार? फेसबूक पोस्टने उडाली खळबळ

MS Dhoni Annoucement : मी नव्या सीझनची आणि नव्या 'भूमिका'ची वाट पाहू शकत नाही, अशी पोस्ट महेंद्रसिंग धोनीने (Mahendra singh dhoni) केली आहे. धोनी लवकरच मोठी घोषणा करू शकतो.

सौरभ तळेकर | Updated: Mar 4, 2024, 08:33 PM IST
MS Dhoni : 'नवी भूमिका...', चेन्नईचा थाला कॅप्टन्सी सोडणार? फेसबूक पोस्टने उडाली खळबळ title=
MS Dhoni Annoucement

Mahendra singh dhoni : टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईने (Chennai Super kings) गेल्या वेळी विजेतेपद पटकावलं होतं. सीएसकेने अंतिम सामन्यात गुजरात टायटन्सचा पराभव केला होता. आता पुन्हा एकदा धोनीच्या (Mahendra Singh Dhoni) नेतृत्वाखाली चेन्नई मैदानात उतरणार आहे. त्यासाठी चेन्नईच्या खेळाडूंनी कालपासून एमए चिदंबरम स्टेडियमवर सराव देखील सुरू केला आहे. अशातच आता धोनी चेन्नईचा कधी जॉईन्ड करणार? असा प्रश्न विचारला जातोय. मात्र, त्याआधीच महेंद्रसिंग धोनीने फेसबूक पोस्ट करत खळबळ उडवली आहे.

काय आहे धोनीची पोस्ट?

मी नव्या सीझनची आणि नव्या 'भूमिका'ची वाट पाहू शकत नाही, अशी पोस्ट महेंद्रसिंग धोनीने केली आहे. धोनी लवकरच मोठी घोषणा करू शकतो. धोनीच्या फेसबूक पोस्टमुळे सध्या चर्चेला उधाण आलं आहे. नव्या भूमिकेत दिसणार असं म्हटल्याने आता धोनी चेन्नईची कॅप्टन्सी सोडणार की काय? की धोनी मेंटॉर म्हणून चेन्नईची संलग्न राहणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

धोनी राजकारणात येणार?

आगामी लोकसभा निवडणुकीत महेंद्रसिंग धोनी राजकारणात एन्ट्री करणार की काय? असा सवाल देखील उपस्थित होत आहे. साऊथ इंडियामध्ये धोनीची क्रेझ पाहता त्याला भाजपकडून तिकीट दिलं जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता आयपीएल बरोबरच धोनी राजकारण देखील खेळणार का? असा सवाल विचारला जातोय.

धोनीचा आयपीएलला 'टाटा गुड बाय'?

यंदाची आयपीएल त्याची शेवटची आयपीएल असेल की नाही? हे मला माहित नाही. बघा, हा चेन्नईच्या कर्णधाराचा प्रश्न आहे, तोच तुम्हाला सरळ उत्तर देईल, असं न्नई सुपर किंग्जचे सीईओ काशी विश्वनाथ (CSK CEO Kasi Viswanathan) यांनी म्हटलं होतं. त्यामुळे धोनी यंदाची आयपीएल खेळणार असल्याचं स्पष्ट झालंय.

IPL 2024: आयपीएलपूर्वी MS Dhoni चं टेन्शन वाढलं; दुखापतीमुळे हा खेळाडू होणार बाहेर

पाहा चेन्नईचा संघ

अजय मंधवाल, अजिंक्य रहाणे, दीपक चहर, डेवॉन कॉनवे (बाहेर), महीश तिक्ष्णा, मथिशा पथिराणा, मिचेल सँटनर, मोईन अली, एमएस धोनी,मुकेश चौधरी, निशांत सिंधू, प्रशांत सोळंकी, राजवर्धन हंगारकेकर, रविंद्र जाडेजा, ऋतुराज गायकवाड, शैख रशीद, शिवम दुबे, सिमरजीत सिंह, तुषार देशपांडे.