Suraj Randiv : आयपीएलमध्ये (IPL) भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीसोबत (MS Dhoni) खेळलेल्या क्रिकेटरवर ऑस्ट्रेलियात राहून बस चालवण्याची वेळ आली आहे. सूरज रणदिव (Suraj Randiv) असे या श्रीलंकन क्रिकेटपटूचे नाव आहे. सुरज रणदिव २०११ मध्ये भारतात खेळल्या गेलेल्या क्रिकेट विश्वचषकात श्रीलंकेच्या संघाचा भाग होता. सूरज रणदिव धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सकडून खेळला आहे. 2012 मध्ये चेन्नईकडून खेळताना रणदीवने 8 सामन्यात 6 विकेट घेतल्या होत्या.
श्रीलंकेकडून क्रिकेट खेळणारा सूरज रणदिव आता क्रिकेटर ते बस ड्रायव्हर झाला आहे. श्रीलंकेचा माजी फिरकीपटू सूरज रणदीव 2019 मध्ये ऑस्ट्रेलियाला गेला, जिथे तो आता बस चालवण्याव्यतिरिक्त स्थानिक क्लबसाठी क्रिकेट खेळतो. सूरज रणदिवने श्रीलंकेकडून 12 कसोटी सामन्यात 46 विकेट घेतल्या आहेत. रणदिवने 31 एकदिवसीय सामन्यात 36 आणि 7 टी-20 सामन्यात 7 बळी घेतले.
भारतीय क्रिकेटचे चाहते सूरज रणदीवला नो-बॉलमुळे ओळखतात. भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागला त्याने 99 धावांवर बाद केलो होते. त्यावेळी सूरज रणदिव प्रसिद्धीच्या झोतात आला जेव्हा तो मुद्दाम नो बॉल टाकताना पकडला गेला. दरम्यान, वीरेंद्र सेहवागला शतक पूर्ण होऊ न देण्यासाठी दिलशानच्या सांगण्यावरून सूरज रणदीवने नो बॉल टाकला होता.
त्यावेळी भारताला विजयासाठी एका धावेची गरज होती आणि सेहवाग 99 धावांवर फलंदाजी करत होता. सेहवागने ती एक धाव काढली असती तर त्याचे शतक पूर्ण झाले असते. अशा स्थितीत कट रचत असताना दिलशानने रणदीवला मुद्दाम नो बॉल टाकण्याचा सल्ला दिला आणि त्याने तेच केले. सेहवागने नो बॉलवर षटकार मारला असला तरी पंचांनी नो बॉलमुळे भारताला विजयी घोषित केले आणि त्याचा षटकार धावांमध्ये जोडला गेला नाही. सेहवाग 99 धावांवर नाबाद राहिला.
त्यानंतर श्रीलंका क्रिकेट बोर्डाने सूरज रणदीवला एका सामन्यासाठी निलंबित केले, तर तिलकरत्ने दिलशानला दंड ठोठावला. सूरज रणदिवने श्रीलंकेसाठी १२ कसोटी सामने खेळले असून त्याच्या नावावर ४३ बळी आहेत. वनडे फॉरमॅटमधील त्याची कामगिरी पाहता त्याने 31 सामने खेळले आणि 36 विकेट घेतल्या.
उदरनिर्वाहासाठी बस ड्रायव्हर
2011 च्या विश्वचषकात श्रीलंका क्रिकेट संघाचा सदस्य असलेला सूरज रणदीव आता ऑस्ट्रेलियात बस चालवत आहे. सूरज, चिंतवा नमस्ते आणि वाडिंग्टन वायंगा यांच्याशिवाय, श्रीलंका आणि झिम्बाब्वेचे माजी क्रिकेट विचारवंत, ऑस्ट्रेलियात स्थायिक झाले आहेत आणि मेलबर्न-आधारित फ्रेंच-आधारित कंपनी ट्रान्सडेव्हमध्ये बस चालक म्हणून काम करत आहेत