Naseem Shah Second Odi Fifer : पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज नसीम शाहने (Naseem Shah) न्यूझीलंड विरूद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात उत्कृष्ट कामगिरी केली आहे. नसीम शाहने न्यूझीलंड विरूद्धच्या सामन्यात 5 विकेट घेतल्या आहेत. या विकेट घेऊन त्याने स्वत:चाच रेकॉ़र्ड मोडला आहे. दरम्यान या त्याच्या कामगिरीने न्यूझीलंड संघ (Pakistan vs New Zealand) 9 विकेट गमावून 255 धावाच करू शकला आहे. आता पाकिस्तानसमोर 256 धावांचे लक्ष्य आहे.
पाकिस्तान आणि न्यूझीलंडमध्ये (Pakistan vs New Zealand)तीन सामन्यांची वनडे मालिका सूरू आहे. या मालिकेतला पहिला सामना आज खेळवला जात आहे. या सामन्यात पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज नसीम शाहने (Naseem Shah) उत्कृष्ट गोलंदाजी केली आहे. नसीन शाहने 5 विकेटस् घेतल्या आहेत. या त्याच्या गोलंदाजीचा पाकिस्तानला मोठा फायदा झाला आहे.
नसीम शाहने (Naseem Shah) दुसऱ्यांदा 5 विकेट्स घेतल्या आहेत. न्यूझीलंडविरूद्धच्या सामन्यात त्याने 57 धावा देऊन 5 विकेट काढल्या आहेत. याआधी देखील त्याने 5 विकेट काढल्या आहेत. नेदलँडस विरूद्धच्या सामन्यात त्याने 35 धावांवर 5 विकेट काढल्या होत्या. हा सामना पाकिस्तानने 9 धावांनी जिंकला होता.
नसीम शाहने (Naseem Shah) 4 वनडे सामन्यात 15 विकेट घेतल्या आहेत. ही कामगिरी आतापर्यंत पाकिस्तानच्या कोणत्या खेळाडूंना करता आली नव्हती. ती कामगिरी आता नसीम शाहने करून दाखवली आहे. नसीम शाहने ही कामगिरी करून रायन हॅरिस आणि गॅरी गिलमोर यांचा विक्रम मोडला आहे. या खेळाडूंनी 14 विकेट घेतल्या होत्या.
दरम्यान पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने टॉस जिंकून न्यूझीलंडला (Pakistan vs New Zealand) प्रथम फलंदाजीस बोलावले होते. न्युझीलंडने प्रथम फलंदाजी करून 9 विकेट गमावून 255 धावा ठोकल्या आहेत. आता पाकिस्तानसमोर 256 धावांचे लक्ष्य आहे. हे लक्ष्य पुर्ण करून पाकिस्तान आता मालिकेत पहिला विजय मिळवते का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.