या स्टार क्रिकरेटची तडकाफडकी निवृत्तीची घोषणा

स्टार क्रिकेटपटूने वयाच्या अवघ्या 29 व्या वर्षी निवृत्ती घेतली आहे.   

Updated: Jan 29, 2022, 10:52 PM IST
या स्टार क्रिकरेटची तडकाफडकी निवृत्तीची घोषणा   title=
मुंबई : क्रिकेट विश्वातून मोठी बातमी समोर येत आहे. स्टार क्रिकेटपटूने वयाच्या अवघ्या 29 व्या वर्षी निवृत्ती घेतली आहे. या स्टार क्रिकेटरने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. नेदरलँडचा फलंदाज बेन कूपरने (Ben Cooper) आठ वर्षानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकला आहे. (netherlands batsman ben cooper retirement at age of 29)
 
"आज मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करत आहे. नेदरलँडचं 8 वर्ष प्रतिनिधित्व करणं ही माझ्यासाठी सन्मानाची बाब आहे", असं ट्विट कूपरने केलं आहे. "तसेच या 8 वर्षांच्या प्रवासात अनेक चढ-उतार पाहिले. अनेक चांगले क्षण अनुभवता आले. मी माझ्या सहकाऱ्यांचा सपोर्ट स्टाफचा ऋणी आहे", अशा शब्दात कूपरने आभार मानले. 
 
कूपरची क्रिकेट कारकिर्द
 
कूपरने ऑगस्ट 2013 मध्ये कॅनडा विरुद्ध वनडे मॅचमधून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल ठेवलं होतं. कूपरने नेदरलँडचं एकूण 13 वनडे आणि 57 टी 20 सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केलं आहे. कूपरने टी 20 मध्ये 1 हजार  239 धावा केल्या आहेत. तर वनडेमध्ये त्याने 187 धावा केल्या आहेत. विशेष म्हणजे कूपर नेदरलँडकडून टी 20 मध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे.