न्यूझीलंड-ऑस्ट्रेलिया मॅचमध्ये रेकॉर्ड्सचा पाऊस

ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात झालेल्या ट्राय सीरिजमधील मॅचमध्ये अनेक रेकॉर्ड्स झाले.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Feb 17, 2018, 08:25 AM IST
न्यूझीलंड-ऑस्ट्रेलिया मॅचमध्ये रेकॉर्ड्सचा पाऊस title=
Image: Cricket Australia

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात झालेल्या ट्राय सीरिजमधील मॅचमध्ये अनेक रेकॉर्ड्स झाले.

टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करताना न्यूझीलंडच्या गुप्टीलने १०५ रन्स केले त्यामुळे टीमने २४३ रन्सपर्यंत मजल मारता आली. यानंतर मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलियन टीमने १९ ओव्हर्समध्येच आव्हान गाठत मॅच जिंकली. 

ऑस्ट्रेलियन टीमकडून डेविड वॉर्नर आणि शॉर्ट यांनी जबरदस्त प्रदर्शन दाखवलं. त्यामुळे ऑस्ट्रेलियन टीमने २४३ रन्सचं आव्हान १९ ओव्हर्समध्येच गाठलं.

न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या टी-२० मॅचमध्ये भलेही ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला असेल. मात्र, दोन्ही टीम्सने आपला शानदार खेळ दाखवला. त्यामुळे या मॅचमध्ये एकापेक्षा एक रेकॉर्ड बनले. एक नजर टाकूयात या मॅचमध्ये बनलेल्या रेकॉर्ड्सवर...

१) न्यूझीलंडचा ओपनर बॅट्समन मार्टिन गुप्टिल आता टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक रन्स बनवणारा खेळाडू ठरला आहे. त्याने मॅक्युलम आणि विराट कोहली यांना मागे टाकलं आहे. गुप्टिलचे टी-२० क्रिकेटमध्ये २१८८ रन्स झाले आहेत. 

मार्टिन गुप्टिल, न्यूझीलंड - २१८८ रन्स, ७१ इनिंग्स 

ब्रेंडन मॅक्युलम, न्यूझीलंड - २१४० रन्स, ७० इनिंग्स 

विराट कोहली, भारत - १९५६ रन्स, ५१ इनिंग्स 

२) या रेकॉर्ड सोबतच मार्टिन गुप्टिलने सेंच्युरी लगावण्यात आपल्याच टीममधील मॅक्युलमला मागे टाकलं आहे. गुप्टिलने ४९ बॉल्समध्ये टी-२० सेंच्युरी केली. यापूर्वी मॅक्युलमने ५० बॉल्समध्ये सेंच्युरी बनवली होती. टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेगाने सेंच्युरी बनवण्याचा रेकॉर्ड टीम इंडियाच्या रोहित शर्मा आणि डेविड मिलरच्या नावावर आहे. या दोघांनीही ३५ बॉल्समध्ये सेंच्युरी केली आहे.

३) न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ऑकलंड येथील मैदानात टी-२० मॅच खेळण्यात आली. १५ मॅचेसमध्ये या मैदानात २०१ हून अधिक सिक्सर मारण्यात आले आहेत. सर्वाधिक सिक्सर मारण्याच्या यादीत हे मैदान पाचव्या क्रमांकावर आहे. तर, पहिल्या क्रमांकावर ढाकाचं मैदान आहे. या ठिकाणी ३७ मॅचेसमध्ये ३१७ सिक्सर क्रिकेटर्सने मारले आहेत.

४) न्यूझीलंडच्या या मैदानात सर्वाधिक रन्सचं टार्गेट गाठण्याचाही रेकॉर्ड बनला आहे. न्यूझीलंडने २४३ रन्स केले. त्यानंतर ऑस्ट्रेलियन टीमने हे आव्हान १९ ओव्हर्समध्ये गाठलं. ऑस्ट्रेलियन टीमने २४५ रन्स केले.

५) टी-२० क्रिकेटच्या इतिहासात पहिली मॅच आहे ज्यामध्ये दोन्ही टीम्सने पहिल्या विकेटसाठी १०० रन्सची पार्टनरशीप केली. न्यूझीलंडकडून मार्टिन गुप्टिल आणि कॉर्लिन मुनरोने १३२ रन्सची पार्टनरशिप केली. यानंतर ऑस्ट्रेलियाच्या डेविड वॉर्नर आणि शॉर्टने १२१ रन्सची पार्टनरशिप केली.

६) डेविड वॉर्नरने या मॅचमध्ये २० बॉल्समध्ये ५० रन्स केले. टी-२० क्रिकेटमध्ये सर्वात कमी बॉल्समध्ये सर्वाधिक हाफ सेंच्युरी करण्यात वॉर्नर-युवराजने बरोबरी केली आहे. दोघांनीही या फॉरमॅटमध्ये कमी बॉल्समध्ये ३ हाफ सेंच्युरी लगावल्या आहेत. यानंतर क्रिस गेल, ग्लेन मॅक्सवेल आणि कॉलिन मुनरो यांनी दोन हाफ सेंच्युरी लगावल्या आहेत.