IND vs AUS: चाहत्यांना मोठा धक्का; टीमचा कर्णधार चौथ्या टेस्टमधून बाहेर

चौथ्या टेस्टपूर्वी एक मोठी बातमी समोर आली आहे. यानुसार, चौथ्या टेस्ट सामन्यातून टीमचा कर्णधार बाहेर झाल्याने मोठा धक्का बसला आहे. 

Updated: Mar 4, 2023, 08:32 PM IST
IND vs AUS: चाहत्यांना मोठा धक्का; टीमचा कर्णधार चौथ्या टेस्टमधून बाहेर  title=

India vs Australia Test: भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यामध्ये सध्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफी (Border–Gavaskar Trophy) खेळवण्यात येतेय. कांगारूंनी तिसऱ्या सामन्यात टीम इंडियाचा (Team India) पराभव केला. मात्र सिरीजमध्ये 2-1 अशी भारताची आघाडी कायम आहे. अशातच चौथ्या टेस्टपूर्वी एक मोठी बातमी समोर आली आहे. यानुसार, चौथ्या टेस्ट सामन्यातून टीमचा कर्णधार बाहेर झाल्याने मोठा धक्का बसला आहे. 

Pat Cummins चौथ्या टेस्टमधून बाहेर

ऑस्ट्रेलिया टीमचा कर्णधार पॅट कमिंस चौथ्या टेस्टमधून बाहेर झाला आहे. तिसऱ्या टेस्ट सामन्यापूर्वी वैयक्तिक कारणांमुळे तो ऑस्ट्रेलियाला जावं लागलं होतं. त्याच्या अनुपस्थितीत टीमची कमान स्टीव्ह स्मिथकडे देण्यात आली होती. स्मिथच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2023 मध्ये कमबॅक करत भारताचा पराभव केला. 
 
मात्र बॉर्डर गावस्कर ट्रॉफी संपण्यापूर्वी आता क्रिकेट ऑस्ट्रेलियाने मोठा निर्णय घेतलाय. अहमदाबादमध्ये खेळल्या जाणाऱ्या निर्णायक सामन्यात बोर्डाने पुन्हा एकदा ऑस्ट्रिलिया टीमच्या कर्णधारपदाची जबाबदारी स्मिथच्या खांद्यावर दिली आहे. मुख्य म्हणजे, चौथा सामना भारतासाठी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. 

ऑस्ट्रेलियाचे मुख्य प्रशिक्षक अँड्र्यू मॅकडोनाल्ड यांच्या म्हणण्यानुसार, खेळाडू आणि पॅट कमिन्स यांच्यामध्ये सध्या चर्चा सुरू आहे. इतकंच नाही तर आम्ही कमिन्सच्या सतत संपर्कात आहोत. तो सध्या भारतात नाहीये आणि चौथी टेस्ट सामना काही दिवसांवर आहे, त्यामुळे आम्ही दररोज कमिन्सशी याविषयी बोलतोय. 

तिसऱ्या टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाचा विजय

तिसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा 9 विकेट्सने पराभव केला आहे. (IND vs AUS 3rd Test) या कसोटी विजयासह ऑस्ट्रेलिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलसाठी पात्र ठरला आहे. (Test Cricket News) दरम्यान, चार सामन्यांच्या बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेत टीम इंडियाने 2 -1 अशी आघाडी कायम ठेवली आहे. या विजयामुळे चौथ्या कसोटीत चुसर निर्माण होण्याची शक्यता आहे. आता कांगारुंसाठीही ही कसोटी मालिका 2 -2 अशी बरोबरी करण्याची संधी आहे. तर टीम इंडिया चौथा सामना जिंकून मालिका जिंकण्याचा प्रयत्न करणार आहे. 

तिसरा सामना जिंकल्यानंतर स्मिथ म्हणाला, 'ही पॅट कमिन्सची टीम आहे आणि तोच या सिरीजचं पुढे नेतृत्व करणार आहे." स्टीव्ह स्मिथच्या बोलण्याच्या अर्थानुसार, त्याने कर्णधारपद सोडलं असून 9 मार्चपासून अहमदाबादमध्ये होणाऱ्या सिरीजमधील चौथ्या आणि शेवटच्या टेस्ट सामन्यात पॅट कमिन्स टीमचं नेतृत्व करू शकतो. मात्र पॅट अनुपस्थितत असल्याने स्मिथकडेच ही धुरा देण्यात येईल.