Ravichandran Ashwin On Ravi Shastri: भारतीय संघ सध्या हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्वाखाली न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. तिथं टीम इंडियाला तीन T20 सामन्यांची मालिका (NZ vs IND t20) खेळणार आहे. यंगिस्तान न्यूझीलंड दौऱ्यावर असताना कोच राहुल द्रविड (Rahul Dravid) यांना न्यूझीलंड दौऱ्यातून विश्रांती देण्यात आली आहे, ज्यावर अनुभवी रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. त्यावर आता आर आश्विने (Ravichandran Ashwin) रवी शास्त्रींना सुनावलं आहे.
मी ब्रेकवर विश्वास ठेवत नाही. मला माझा संघ आणि खेळाडू समजून घ्यायचं आहेत. खरं सांगायचं तर, तुम्हाला अशा ब्रेकची गरज का आहे? तुमच्याकडे आयपीएलमध्ये 2-3 महिने विश्रांतीसाठी आहे, प्रशिक्षक म्हणून तुमच्याकडे विश्रांतीसाठी पुरेसा वेळ आहे, असा शब्दात शास्त्री (Ravi Shastri criticism) यांनी राहुल द्रविड यांच्यावर टीका केली होती. त्यावर आश्विनने प्रत्युत्तर दिलंय. (Ravichandran Ashwin defends India coach Rahul Dravid after Ravi Shastri criticism for missing New Zealand tour)
व्हीव्हीएस लक्ष्मण पूर्णपणे वेगळ्या संघासह तिथं गेले आहेत, कारण याचाही वेगळा अर्थ लावला जाऊ शकतो. राहुल द्रविड आणि त्याच्या टीमने T20 विश्वचषकापूर्वी नियोजन करण्यापासून ते प्लॅनिंगपर्यंत बरंच काम केलंय. मी त्यांना जवळून पाहिले आहे म्हणून मी हे सांगतोय, असं आश्विन (Ravichandran Ashwin) म्हणाला.
आणखी वाचा - Team India सांभाळण्यासाठी पांड्या सक्षम आहे का? DK म्हणतो "मला वाटत नाही की..."
दरम्यान, रवी शास्त्री (Rahul Dravid) यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने चोख प्रत्युत्तर दिलंय. प्रत्येक ठिकाणासाठी आणि प्रत्येक प्रतिस्पर्ध्यांसाठी राहुल द्रविड यांनी विशिष्ट योजना आखल्या होत्या. त्यामुळे ते केवळ मानसिकच नव्हे तर शारीरिकदृष्ट्याही थकलं आहेत आणि प्रत्येकाला विश्रांतीची गरज आहे, असं आश्विन म्हणाला आहे.