अहमदाबाद : भारतीय क्रिकेट संघाचा (Indian Team) विकेटकीपर ऋषभ पंत (Rishabh Pant) सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. अहमदाबादमध्ये इंग्लंडविरुद्ध त्याने शानदार शतक झळकावले आहे. भारतीय संघासाठी पंतने पहिल्या डावात 101 धावा केल्या. कसोटी कारकीर्दीत दुसऱ्यांदा या खेळाडूने षटकारासह आपले शतक पूर्ण केले आणि एक अद्भुत कामगिरी केली. जी मागील 57 वर्षांत कोणत्याही भारतीय विकेटकीपरने केलेली नाही.
ऋषभ पंतने अहमदाबाद कसोटी सामन्याच्या दुसर्या दिवशी शानदार खेळी केली. भारताने आपली चौथी विकेट 80 धावांवर गमावली होती. पंतने आक्रमक फटकेबाजी करत शतक पूर्ण केले. वॉशिंग्टन सुंदरबरोबर शतकीय भागीदारी करत पंतने संघाला धार दिली. त्याने 118 चेंडूत 13 चौकार आणि 2 षटकारांसह 101 धावा ठोकल्या.
57 वर्षानंतर रेकॉर्ड
इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात दोन शतकांच्या बाबतीत ऋषभ पंतने माजी भारतीय क्रिकेटर बुधी कुंदरनची बरोबरी केली. 1964 मध्ये जेव्हा भारतीय विकेटकीपरने इंग्लंडविरुद्धच्या कसोटीत दोन शतके ठोकली तेव्हा हे घडले होते. पंतने 57 वर्षानंतर हे केले. आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे त्याच्या कसोटी कारकीर्दीचे पहिले शतकही या फलंदाजाने इंग्लंडविरुद्ध ठोकले होते.
Rishabh Pant brings up his hundred with a SIX
A sensational knock from the India batsman!#INDvENG | https://t.co/6OuUwURcgX pic.twitter.com/b04djHMikJ
— ICC (@ICC) March 5, 2021
ऋषभ पंतने 2018 मध्ये इंग्लंडविरुद्ध आदिल रशीदच्या बॉलवर सिक्स मारुन शतक पूर्ण केले होते. आता 2021 मध्ये त्याने इंग्लंडचा कर्णधार जो रुटच्या बॉलवर सिक्स मारत शतक पूर्ण केले. पंतचे हे देशातील पहिले कसोटी शतक आहे. यापूर्वी तो तीनवेळा नर्वस 90 चा बळी ठरला होता.