मुंबई : यंदाच्या आयपीएल मुंबई इंडियन्ससाठी जणू एक वाईट स्वप्न होतं. 9 सामन्यांमध्ये केवळ एका सामन्यात विजय मिळवता आला असल्याने मुंबईसाठी प्लेऑफचे दरवाजे बंद झाले आहेत. दरम्यान मुंबईनंतर आता चेन्नई सुपर किंग्जसाठी देखील प्लेऑफचा रस्ता बंद झाला आहे.
काल रॉयल चॅलेंजर बंगळूरूसोबत झालेल्या सामन्यात पराभव स्विकारल्यानंतर आता चेन्नईची टीम प्लेऑफपर्यंत पोहोचू शकणार नाहीये. यंदाच्या आयपीएलमधून चेन्नईचे टीमही बाहेर गेल्यानंतर मुंबईचा कर्णधार रोहित शर्माचा एक डान्स व्हिडीयो मात्र जोरात व्हायरल होताना दिसतोय.
सोशल मीडियावर एका मीम्स बनवणाऱ्या अकाऊंटने हा व्हिडियो पोस्ट केला आहे. यामध्ये विराट आणि रोहित शर्मा एका जाहिरातीसाठी डान्स करताना दिसतायत. याच व्हिडीयोचा वापर करून, 'सीएसके आयपीएलमधून बाहेर पडल्यावर रोहितचा डान्स' असं मीम बनवण्यात आलं आहे. याला पुष्पाचं श्रीवल्ली गाणंही लावण्यात आलं आहे. हा व्हिडीयो सोशल मीडियावर व्हायरल करण्यात होतोय.
चेन्नईच्या टीमने आतापर्यंत झालेल्या 10 पैकी 7 सामने गमवले आहेत. तर 3 सामने जिंकले आहेत. प्लेऑफपर्यंत जाण्यासाठी 16 गुणांची आवश्यकता होती. मात्र कालचा सामना गमावल्यानंतर चेन्नईसाठी आता प्लेऑफचे दरवाजे बंद झाले आहेत. प्लेऑफच्या स्पर्धेतून चेन्नई टीम आऊट झाली आहे. यासंदर्भात अधिकृत घोषणा होणं अद्याप बाकी आहे.
समजा जर चेन्नई पुढे 4 ही सामने जिंकली आणि रनरेटही त्यांना चांगला ठेवता आला तर त्यांच्याकडे 14 पॉईंट होतात. बाकी टीमना 10, 12, 14 आणि 16 गुण आहेत. त्यामुळे चेन्नईला हे कठीण जाणार आहे.