Rohit sharma, PAK vs IND : भारत आणि पाकिस्तान यांच्यात सुरू असलेल्या सामन्यात रोहित शर्मा (Rohit Sharma) टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. तब्बल 4 वर्षानंतर टीम इंडिया पाकिस्तानविरुद्ध खेळणार असल्याने सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. रोहित शर्माने प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन धक्कादायक निर्णय घेतले आहेत. त्यामुळे आता पाऊस आला तरी टेन्शन नाही, अशी चर्चा होताना दिसत आहे. रोहित शर्माने अपेक्षेप्रमाणे दोन योग्य निर्णय घेतले.
पाकिस्तान संघाने सामन्याच्या एक दिवस आधीच संघ जाहीर केला होता. मात्र, रोहित शर्माने टॉस जिंकल्यानंतर कोण खेळणार याचे पत्ते उघडले आहेत. पावसाचा अंदाज घेऊन रोहितने संघात बदल केले आहेत. रोहित शर्माने संघात कुलदीप यादव आणि शार्दुल ठाकूर यांना संधी दिली आहे. त्यामुळे आता क्रिडाविश्वात सर्वांच्या भूवया उंचावल्या आहेत.
पेपरवर पाहिलं तर भारत आणि पाकिस्तान यांचे संघ तोडीस तोड आहेत. मात्र, दोन्ही संघात एक्स फॅक्टर आहे तो कुलदीप यादव. चायना मॅन गोलंदाज (Kuldeep Yadav) फक्त भारताकडे आहे. याचाच फायदा रोहित शर्माने घेतलाय. तर दुसरीकडे पाकिस्तानविरुद्ध सर्वात प्रभावी ठरलाय तो भुवनेश्वर कुमार... भुवीला रिप्लेस कोण करणार? असा सवाल विचारला जात होता. त्यावर आता स्विंगर बॉलर म्हणून शार्दुलला (Shardul Thakur) संधी मिळाली आहे. त्यामुळे पाऊसामुळे बॉलिंगची ग्रीप जरी गेली तरी शार्दुल विकेट घेऊ शकतो. तर कुपदीप आणि जडेजा देखील अखेरच्या वेळात कमाल दाखवू शकतात.
& Let's GO!
Follow the match https://t.co/hPVV0wT83S#AsiaCup2023 | #TeamIndia | #INDvPAK pic.twitter.com/3E3lvstWdX
— BCCI (@BCCI) September 2, 2023
भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (C), शुभमन गिल, इशान किशन (WK), विराट कोहली, श्रेयस अय्यर, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
पाकिस्तान (प्लेइंग इलेव्हन): फखर जमान, इमाम-उल-हक, बाबर आझम (C), मोहम्मद रिझवान (WK), आगा सलमान, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, हरिस रौफ.