मुंबई : टीम इंडियाचा (Team India) दिग्गज ऑफ स्पिनर हरभजन सिंहने (Harbhajan Singh) शुक्रवारी 24 डिसेंबरला क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली. हरभजनची 23 वर्षाची क्रिकेट कारकिर्द राहिली. भज्जीच्या निवृत्तीनंतर अनेक दिग्गजांनी प्रतिक्रिया देत त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. याशिवाय हरभजनने आयपीएलच्या पहिल्या मोसमात थोबडवलेल्या श्रीसंतनेही (S Sreesanth) भज्जीच्या निवृत्तीवर अशी प्रतिक्रिया दिली आहे, जी त्याला आयुष्यभर लक्षात राहिल. (s sreesanth give reaction on team india senior off spinner harbhajan singh retirement)
श्रीसंत काय म्हणाला?
श्रीसंतने भज्जीसाठी ट्विटद्वारे भावूक पोस्ट लिहिली आहे. तु फक्त टीम इंडियाचाच नाही, तर क्रिकेट विश्वातील सर्वोत्तम क्रिकेटपटू म्हणून ओळखला जातोस. तुझ्यासोबत खेळणं हे माझ्यासाठी गर्वाची बाब आहे. बॉलिंगच्या सुरुवातीआधी तुझी गळाभेट घेणं हे नेहमीच लक्षात राहिल. तुझ्यासाठी खूप प्रेम आणि आदर", अशा शब्दात श्रीसंतने आपल्या भावना मांडल्या.
भज्जीची क्रिकेट कारकिर्दीतील सुवर्ण क्षण
भज्जीने वयाच्या 17 व्या वर्षी कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. तसेच भज्जी टीम इंडियाकडून कसोटीमध्ये हॅट्रिक घेणारा पहिला गोलंदाज होता. भज्जीने टीम इंडियाला 2007 आणि 2011 चा वर्ल्ड कप जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.
भज्जीची तिन्ही फॉर्मेटमधील आकडेवारी
भज्जीने 103 कसोटी, 236 एकदिवसीय आणि 28 टी 20 सामन्यात टीम इंडियाचं प्रतिनिधित्व केलं होतं. भज्जीने टेस्ट क्रिकेटमध्ये 417 विकेट्स घेतल्या होत्या. एकदिवसीय क्रिकेटमध्ये 269 बळी घेतले. तर टी 20 फॉर्मेटमध्ये 25 जणांना त्याने माघारी पाठवलंय.
@harbhajan_singh Ur gonna be the one of the best ever played cricket not just for india but in world of cricket..it’s a huge honour to know u and to have played with you b bhajjipa ….will always cherish the lovely hugs( lucky for me ) before my spells ) lots of love and respect pic.twitter.com/5IgYJk4HcD
— Sreesanth (@sreesanth36) December 24, 2021