...अन् 1 मिनिट फलंदाजही सामन्यात गोंधळला, फेक फील्डिंगचा जबरदस्त व्हिडीओ

एका इशाऱ्यानं खेळ बदलला, क्रिझवर असलेला फलंदाज रनआऊट झाला, पाहा व्हिडीओ

Updated: Apr 5, 2021, 02:33 PM IST
...अन् 1 मिनिट फलंदाजही सामन्यात गोंधळला, फेक फील्डिंगचा जबरदस्त व्हिडीओ title=

मुंबई: फलंदाजी करणाऱ्या टीमला गोंधळात टाकण्याचे प्रकार काही नवीन नाहीत. धोनी असो किंवा ऋषभ पंत कायमच फलंदाजांना बाचकवण्यात त्यांचा हातखंड आहे. पण यापेक्षाही जबरदस्त सीन मैदानात प्रत्यक्षात घडला. फलंदाजाला गोंधळात टाकण्याच्या या ट्रीकमुळे फलंदाज आऊट झाला आणि फेक फील्डिंगवर मात्र अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. 

सामन्यादरम्यान नेमकं काय घडलं? 
साऊथ अफ्रिका विरुद्ध पाकिस्तान मैदाना सामना सुरू होता. त्याच वेळी पाकिस्तनचा फलंदाज फखर जमां क्रिझवर खेळत होता. त्याने आलेला चेंडू टोलवला आणि रन काढण्यासाठी धावत असताना फेक फील्डिंगमध्ये अडकला. त्यामुळे तो रनआऊट झाला आहे. 

जोहान्सबर्ग इथे रविवारी झालेल्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय वन डे सामन्यादरम्यान हा प्रकार घडला. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

पाकिस्तानी फलंदाजानं चेंडू टोलवल्यानंतर त्याला बाद करण्यासाठी विकेटकीपर क्विंटन डी कॉक स्टम्पवर आला आणि नॉन-स्ट्रायकर एन्डकडे लक्ष वेधले. त्यावेळी विकेटकीपरनं गोंधळात टाकणारा इशारा केला आणि फलंदाज त्या एका इशाऱ्यामुळे रनआऊट झाला. 

Tags: