मुंबई : सचिन तेंडुलकर, युवराज सिंग आणि जॉन्टी रोड्ससारखे दिग्गज खेळाडू पुन्हा एकदा मैदानावर एकमेकांशी लढताना दिसणार आहेत. रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीज 2022 ही 10 सप्टेंबरपासून दुसऱ्या सीझनसह कमबॅक करतेय. यावेळी ही स्पर्धा भारतात खेळवली जाणार आहे. स्पर्धेतील पहिले 6 सामने कानपूरमध्ये होणार आहेत.
आज म्हणजेच 10 सप्टेंबर रोजी ग्रीन पार्क स्टेडियममध्ये क्रिकेट चाहत्यांना त्याचे जुने खेळाडू पाहायला मिळणार आहेत. आज रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीजचा पहिला सामना भारत आणि दक्षिण आफ्रिकेच्या लीजेंड टीममध्ये खेळवला जाईल. भारतीय टीमचा कर्णधार सचिन तेंडुलकरकडे असेल, तर दक्षिण आफ्रिका टीमची कमान सर्वोत्तम क्षेत्ररक्षक जॉन्टी रोड्सकडे असणार आहे.
इंडिया लिजेंड्स विरुद्ध दक्षिण आफ्रिका लिजेंड्स यांच्यातील रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजचा पहिला सामना संध्याकाळी 7:30 वाजता सुरू होईल. या सामन्याचे थेट प्रक्षेपण तुम्ही कलर्स सिनेप्लेक्स, कलर्स सिनेप्लेक्स सुपरहिट्स आणि स्पोर्ट्स 18 वर पाहू शकता.
इंडिया लीजेंड्स आणि दक्षिण आफ्रिका लीजेंड्स यांच्यातील या सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग जिओ टीव्ही आणि वूटवर उपलब्ध असणार आहे. याशिवाय, तुम्ही थर्ड पार्टी अॅप पिकासोवर मोफत लाइव्ह स्ट्रीमिंगचा आनंद घेऊ शकता.
इंडिया लीजेंड्स- सचिन तेंडुलकर (कर्णधार), युवराज सिंह, इरफान पठान, यूसुफ पठान, हरभजन सिंह, मुनाफ पटेल, सुब्रमण्यम बद्रीनाथ, स्टुअर्ट बिन्नी, नमन ओझा, मनप्रीत गोनी, प्रज्ञान ओझा, विनय कुमार, अभिमन्यु मिथुन, राजेश पवार आणि राहुल शर्मा.
दक्षिण अफ्रीका लीजेंड्स- जोंटी रोड्स(कर्णधार), अल्विरो पीटरसन, एंड्रयू पुटिक, एडी ली, गार्नेट क्रूगर, हेनरी डेविड्स, जॅक्स रूडोल्फ, जोहान बोथा, जोहान वॅन डेर वाथ, लांस क्लूजनर, एल नॉरिस जोन्स, मखाया एनटिनी, मोर्ने वॅन विक, टी तशाबाला, वर्नोन फिलेंडर, आणि जेंडर डी ब्रुस.