IND VS AUS 4th Test : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India VS Australia) यांच्यात मेलबर्नमध्ये सुरु असलेला चौथा सामना हा टीम इंडियासाठी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये (WTC Final) पोहोचण्या करता अतिशय महत्वाचा आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने तब्बल 474 धावांचा डोंगर उभा केला होता. तर टीम इंडियाच्या टॉप आणि मिडल ऑर्डरमध्ये जयस्वाल वगळता इतर कोणत्याही फलंदाजाला समाधानकारक कामगिरी करता आली नाही. टीम इंडियाचे दिग्गज फलंदाज स्वस्तात बाद होऊन माघारी परतत असताना स्टार फलंदाज ऋषभ पंत (Rishabh Pant) भारतासाठी महत्वाच्या प्रसंगी मोठी कामगिरी करू शकेल अशी अपेक्षा होती. परंतु खराब शॉट खेळून पंत बाद झाल्याचे पाहून कॉमेंट्री बॉक्समध्ये असलेले सुनील गावसकर (Sunil Gavaskar) त्याच्यावर संतापले. सध्या याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
टीम इंडियाचा स्टार विकेटकिपर फलंदाज ऋषभ पंतने तिसऱ्या दिवशी भारताच्या पहिल्या इनिंगमध्ये केवळ 28 धावा करून बाद झाला. ५६ व्या ओव्हरच्या ४ थ्या बॉलवर स्कॉट बोलँडने पंतची विकेट घेतली. बोलँडने टाकलेल्या बॉलवर स्कूप शॉट खेळताना पंतने कॅच आउट झाला आणि नॅथन लिऑनने त्याची कॅच पकडली. महत्वाच्यावेळी खराब शॉट खेळून स्वस्तात विकेट गमावल्याने कॉमेंट्री बॉक्समध्ये असलेले सुनील गावसकर पंतवर संतापले. यानंतर त्यांनी ऋषभ पंतला तीनवेळा मुर्ख, मुर्ख, मुर्ख असे म्हंटलं.
कॉमेंट्री करताना सुनील गावसकर म्हणाले की, "मुर्ख, मुर्ख, मुर्ख..., तू अशा ठिकाणी शॉट खेळाला जिथे पहिल्यापासून दोन फिल्डर्स उभे होते. आधीच शॉट तू मिस केलास आणि बघ आता कुठे आऊट झालास. हे तर फुकटच विकेट गमावल्या सारखे आहे. तू अशावेळी विकेट गमावलास जेसीव्ह तुला माहित होते की संघाला तुझी किती गरज आहे. तू यावर असं नाही म्हणू शकत की हा माझा नैसर्गिक खेळ आहे. हा तुझा नैसर्गिक खेळ नाही. हा मूर्खपणे मारलेला शॉट आहे. तू संघाला निराश केलंत. तुम्हाला तर ड्रेसिंग रूममध्ये सुद्धा जायला नको. तुला दुसऱ्या ड्रेसिंग रूममध्ये जायला हवं'.
टीम इंडियाने मेलबर्न टेस्टच्या तिसऱ्या दिवशी 9 विकेट्स गमावून 358 धावा केल्या. परंतु दिवसाअंती ऑस्ट्रेलिया 116 धावांनी अजूनही आघाडीवर आहे. ऑस्ट्रेलियाकडून गोलंदाज पॅट कमिन्स आणि स्कॉट बोलँडने प्रत्येकी भारताच्या तीन विकेट्स घेतल्या तर नॅथन लिऑनने 2 विकेट्स घेतल्या.
यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, आकाश दीप