T20 World Cup 2022: टी-20 वर्ल्डकपचा आता केवळ अंतिम सामना बाकी आहे. इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यामध्ये टी- 20 वर्ल्डकपचा फायनल सामना खेळला जाणार आहे. दरम्यान शुक्रवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) जाहीर केलंय की, रविवारी मेलबर्नवर खेळल्या जाणाऱ्या फायनल सामन्यात कोणते अंपायर असणार आहेत. या सामन्यासाठी मरायस इरास्मस आणि कुमार धर्मसेना हे मैदानावरील अंपायर म्हणून काम करणार आहेत.
सिडनीमध्ये पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या उपांत्य सामन्यात इरास्मस मैदानी अंपायर होते. तर अॅडलेडमध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या सेमीफायनसच्या सामन्यात धर्मसेना मैदानी अंपायर म्हणून काम पाहत होते.
या व्यतिरीक्त फायनल सामन्यासाठी ख्रिस गफानी टीव्ही अंपायर असेल तर पॉल रीफेल फोर्थ अंपायर म्हणून काम पाहणार आहे. याशिवाय सामनाधिकारीची जबाबदारी रंजन मदुगले घेणार आहेत.
पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात होणारा अंतिम सामना रविवारी म्हणजेच 13 नोव्हेंबर रोजी भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 वाजता सुरू होणार आहे. हा सामना मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर खेळवण्यात येणार आहे. मेलबर्न क्रिकेट ग्राऊंड हे एक सर्वात मोठं मैदान आहे. या मैदानावर गोलंदाज आणि फलंदाजांना समान मदत मिळू शकते.
या सामन्याचे लाईव्ह स्ट्रिमींग स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनल्सवर पाहता येणार आहे. याचसोबत तुम्ही Disney+ Hotstar अॅपवर देखील फायनल सामना पाहू शकता.