England Bowler 43 Runs In Over Watch Video: एकीकडे वेस्ट इंडिजमध्ये टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत आज इंग्लंड आणि भारतामध्ये सेमी-फायनलचा सामना खेळवला जाणार असतानाच दुसरीकडे इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ओली रॉबिन्सनने बुधवारी एक फारच विचित्र आणि नकोसा विक्रम स्वत:च्या नावावर केला. इंग्लंडमधील काऊंटी चॅम्पियनशिप सामन्यामध्ये ओली रॉबिन्सनने एका ओव्हरमध्ये चक्क 43 धावा दिल्या. प्रथम श्रेणी क्रिकेटच्या इतिहासामध्ये ही दुसरी सर्वात महागडी ओव्हर ठरली आहे. उजव्या हाताच्या या 30 वर्षीय गोलंदाजाने इंग्लंडसाठी 2021 मध्ये पदार्पण केलं असून 20 कसोटी सामने तो खेळला आहे.
सनक्सेसच्या टीमकडून लीसेस्टरशायरच्या संघाविरुद्ध गोलंदाजी करताना ओली रॉबिन्सनने आपल्या एका ओव्हरमध्ये एकूण 9 बॉल टाकले. या 9 बॉलमध्ये लीसेस्टरशायरच्या लुईस किम्बरने तब्बल 43 धावा कुटल्या. यामध्ये 5 षटकार, 3 चौकार आणि एक धाव पळून काढली. 5 पैकी 3 षटकार नो बॉलवर लगावले. लीसेस्टरशायरच्या दुसऱ्या डावातील 59 व्या ओव्हरमध्ये लुईसने ही कामगिरी केली. ओव्हर सुरु झाली तेव्हा लुईस 56 बॉलमध्ये 72 धावांवर खेळत होता. ही ओव्हर पूर्ण झाली तेव्हा लुईसचा स्कोअर 65 बॉल 109 इतका होता. लीस्टेस्टरशायरसमोर सनक्सेसने एकूण 446 धावांचं टार्गेट ठेवलं.
नक्की पाहा >> 'आपको अपना दिमाग...', रोहित शर्मा इंझमामवर भडकला; बॉल टॅम्परिंगच्या आरोपांवरुन झापलं
ओली रॉबिन्सची ही या सामन्यातील 13 वी ओव्हर होती. यामध्ये त्याने पहिल्या बॉलवर षटकार खाल्ला. त्यानंतर लुईसने नो बॉलवर षटकार लगावला. ओव्हरमधील दुसरा अधिकृत बॉलही चौकार लगावला. त्यानंतर तिसरा बॉल षटकार, चौथा चौकार लगावल्यानंतर पाचवा बॉल नो बॉल पडला ज्यावर षटकार लगावला. त्यानंतर पाचव्या अधिकृत बॉलवर चौकार लगावला. सहावा बॉल टाकताना ओलीने पुन्हा नो बॉल टाकला ज्यावर लुईसने षटकार लगावला. अखेर शेवटच्या अधिकृत बॉलवर लुईसने पळून एक धाव काढली. म्हणजेच थोडक्यात सांगायचं झालं तर ही ओव्हर 6, 6NB, 4, 6, 4, 6NB, 4, 6NB, 1 अशी पडली. ओलीने रॉबिन्सने इंग्लंडच्या खेळाडूकडून सर्वाधिक धावा देण्याचा विक्रमही मोडला. तुम्ही पाहा हा विचित्र ओव्हर...
LOUIS KIMBER HAS TAKEN 43 OFF AN OVER pic.twitter.com/kQ4cLUhKN9
— Vitality County Championship (@CountyChamp) June 26, 2024
पूर्वी हा नकोसा विक्रम अॅलेक्स ट्यूडरच्या नावावर होता. त्याने एका ओव्हरमध्ये 38 धावा दिलेल्या. 1998 साली ट्यूडरने सरे विरुद्ध लेकशायर संघादरम्यानच्या सामन्यात अँड्र्यू फ्लिंटॉफने एकट्याने ट्यूडरच्या ओव्हरमध्ये 34 धावा केलेल्या. आता 26 वर्षांनी हा विक्रम मोडीत काढला आहे.
नक्की वाचा >> अखेर दक्षिण आफ्रिकेने Chokers चा ठपका पुसला! T20 World Cup च्या फायनलमध्ये दणक्यात एन्ट्री
प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये एका ओव्हरमध्ये सर्वाधिक धावा देण्याचा विक्रम 1990 साली झाला. वेलिंग्टन आणि कॅटरबरीदरम्यानच्या शेल ट्रॉफी सामन्यामध्ये न्यूझीलंडचा माजी ऑफ ब्रेक गोलंदाज वर्ट वान्सने 77 धावा दिल्या होताय. त्याने या एका ओव्हरमध्ये तब्बल 17 नो बॉल टाकले होते. वान्स न्यूझीलंडसाठी चार कसोटी आणि 8 एकदिवसीय सामने खेळला आहे.