Rafael Nadal : टेनिसचा सुपरस्टार राफेल नडालने घेतली निवृत्ती, कधी खेळणार शेवटची मॅच?

38 व्या वर्षी त्याने टेनिसमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला असून कारकिर्दीत त्याने अनेक मोठे रेकॉर्डस् आपल्या नावे केले. सोशल मीडियावर निवृत्तीची पोस्ट करून त्याने अचानक  फॅन्सना आश्चर्याचा धक्का दिला.

पुजा पवार | Updated: Oct 10, 2024, 05:05 PM IST
Rafael Nadal : टेनिसचा सुपरस्टार राफेल नडालने घेतली निवृत्ती, कधी खेळणार शेवटची मॅच?  title=
(Photo Credit : Social Media)

Rafael Nadal Retirement : टेनिसमधला सुपरस्टार आणि 22 वेळा ग्रँड स्लॅम चॅम्पियनशिप जिंकलेला स्पॅनिश खेळाडू राफेल नडाल याने 9 ऑक्टोबर गुरुवारी निवृत्तीची घोषणा केली. 38 व्या वर्षी त्याने टेनिसमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला असून कारकिर्दीत त्याने अनेक मोठे रेकॉर्डस् आपल्या नावे केले. सोशल मीडियावर निवृत्तीची पोस्ट करून त्याने अचानक  फॅन्सना धक्का दिला. यावेळी निवृत्तीची बातमी सांगताना नडाल स्वतः भावुक झाल्याचे पाहायला मिळाले.  

नडालचं टेनिस करिअर हे फार उत्तम राहिली. निवृत्तीची घोषणा राफेल नडालने इंस्टाग्रामवर केली. त्याने एक व्हिडीओ शेअर करत म्हंटले की, 'मी सांगू इच्छितो की प्रोफेशनल टेनिसमधून मी निवृत्ती घेत आहे, माझ्यासाठी मागील काही वर्ष ही फार कठीण होती', असं म्हणताना नडाल भावुक झाला. 

हेही वाचा : Women's T20 World Cup 2024 चा सर्वात मोठा स्कोअर, श्रीलंकेला पराभूत करत भारताने बदललं सेमी फायनलचं समीकरण

 

व्हिडीओ : 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Rafa Nadal (@rafaelnadal)

 

राफेल नडालचं करिअर : 

राफेल नडालने आपल्या टेनिस करिअरमध्ये तब्बल 22 वेळा ग्रँड स्लॅम चॅम्पियनशिप जिंकली आहे. नडालने  2009 आणि  2022 मध्ये ऑस्ट्रेलियन ओपनचा खिताब जिंकला होता. तर 2010, 2013, 2017 आणि 2019 मध्ये यूएस ओपनचा खिताब त्याने पटकावला. नडाल 2008 आणि 2010 मध्ये विम्बलडनचा खिताब सुद्धा जिंकले आहेत. 

कधी खेळणार शेवटची मॅच?

स्पॅनिश टेनिस प्लेअर राफेल नडालने निवृत्ती घेताना सांगितले की त्याचा शेवटचा सामना हा डेविस कप मध्ये खेळेल. डेविस कप ही त्याची टेनिसमधील शेवटची स्पर्धा असून ही स्पर्धा त्याचाच देश म्हणजेच स्पेनमध्ये खेळवण्यात येईल. या स्पर्धेचा नॉकआउट राउंड्स 10 पासून 24 नोव्हेंबर दरम्यान होतील.