ग्रेट खलीकडून रेसलिंग करिअरमधला पहिला व्हिडिओ शेअर

खलीने २००६मध्ये WWEमध्ये पदार्पण केले. २०१४ पासून तो WWEच्या रिंगपासून कागसा दूर झाला

Updated: Jul 28, 2018, 12:27 PM IST
ग्रेट खलीकडून रेसलिंग करिअरमधला पहिला व्हिडिओ शेअर title=

नवी दिल्ली: WWEची क्रेझ जगभरात किती आहे हे तर आपण जाणताच. पण, अशा या जगप्रसिद्ध WWEमध्ये भारताचे नाव अपवादानेच आले. हा अपवाद ठरला द ग्रेट खली. WWEच्या माध्यमातून ग्रेट खलीने जगभरात आपली ओळख निर्माण केली आहे. आजवर खलीने जॉन सिना, द अंडरटेकर आणि बटीस्टासारख्या WWEच्या दिग्गज रेसलर्सना धूळ चारली आहे. पण, असे असूनही खलीने आपल्या सोशल मीडियावर याबाबत फारसे कधी शेअर केल नव्हते. मात्र, खलीने नुकताच एक व्हिडिओ आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ खलीच्या रेसलींग कारकिर्दीतील पहिला व्हिडिओ असल्याचे सांगितले जात आहे.

खलीचा पदार्पणातील व्हिडिओ

व्हिडिओमध्ये दिसते की, खलीने प्रतिस्पर्धी रेसलरला कशी धूळ चारली. आगोदरच उंचीने कमी असलेला प्रतिस्पर्धी खलीच्या आव्हानात्मक खेळीसमोर अधिकच कमी ठरला. प्रतिस्पर्धी रेसलर खलीवर अेकदा प्रहार करत राहिला पण, खलीवर काहीच परिणाम होतना दिसला नाही. त्यामुळे या सामन्याचा निकाल स्पष्ट होता. खलीने अगदी सहजपणे हा सामना खिशात घातला. 

 

My 1st fight #wrestling #wwe @the_greatkhali_show_returns

A post shared by The Great Khali (@dalipsinghcwe) on

भारतातही CWEची सुरवात

दरम्यान, खलीने २००६मध्ये WWEमध्ये पदार्पण केले. २०१४ पासून तो WWEच्या रिंगपासून कागसा दूर झाला. त्याने २०१५मध्ये WWEच्या धर्तीवर CWE (कॉन्टीनेंटल रेसलिंग एटटेन्मेंट) केले. त्याच्या या कंपनीमध्ये अनेक तरून नशीब आजमावत आहेत. CWE मधून कविता देवी सारख्या महिला रेसलरनेही जगभरात नाव कमावले आहे. कविता देवीही WWEमधील पहिला महिला रेसलर आहे.