दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या टी20 संघात 'या' खेळाडूला डावललं; माजी क्रिकेटपटू सिलेक्टर्सवर संतापले

बीसीसीआयने (BCCI) रविवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाच सामन्यांच्या T20 मालिकेसाठी 18 सदस्यीय भारतीय संघाची घोषणा केली आहे. 

Updated: May 23, 2022, 06:22 PM IST
दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या टी20 संघात 'या' खेळाडूला डावललं; माजी क्रिकेटपटू सिलेक्टर्सवर संतापले  title=

मुंबई : बीसीसीआयने (BCCI) रविवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाच सामन्यांच्या T20 मालिकेसाठी 18 सदस्यीय भारतीय संघाची घोषणा केली आहे. या संघात अनेक तरूण खेळाडूंना डावलण्यात आले आहे. त्यामुळे अनेक खेळाडू नाराजी व्यक्त करताना दिसतायत. त्यात आता भारताचे माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग आणि हरभजन सिंग यांनी या एका खेळाडूचे सिलेक्शन झाल्यामुळे नाराजी व्यक्त केली आहे.  

IPL 2022 मध्ये अनेक युवा खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी केली. याचेच फळ म्हणून उमरान मलिक आणि अर्शदीप सिंग सारख्या खेळाडूंचे भारतीय संघात निवड झाली. मात्र काही खेळाडूंच्या वाट्याला निराशा आली. या खेळाडूंमध्ये सनरायझर्स हैदराबाद (SRH) च्या राहुल त्रिपाठीचे नाव देखील समाविष्ट आहे. माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग आणि हरभजन सिंग यांनी राहुल त्रिपाठीची निवड न झाल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.

हरभजन सिंहने ट्विटरवर लिहिले की, 'राहुल त्रिपाठीला संघात स्थान न मिळाल्याने निराश झालो. त्याला संधी मिळायला हवी होती, असे त्याचे मत आहे.  

वीरेंद्र सेहवागने राहुल त्रिपाठीची तुलना सूर्यकुमार यादवशी केली. मुंबई इंडियन्सचा फलंदाज सूर्यकुमार यादवने गेल्या काही वर्षांत आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी केली होती, त्यानंतर सूर्याला गेल्या वर्षी भारतीय संघाकडून खेळण्याची संधी मिळाली. नंतर त्याची T20 विश्वचषक संघासाठीही निवड झाली.

'मला वाटते की आम्ही गेल्या वर्षी सूर्यकुमारबद्दल असेच म्हणत होतो. संयम हा एक गुण आहे. राहुल त्रिपाठी दीर्घकाळ उत्कृष्ट खेळ दाखवूनही निवडकर्त्यांच्या रडारपासून दूर असल्याची नाराजी सेहवागने व्यक्त केली. 

आयपीएलच्या चालू हंगामात राहुल त्रिपाठीने 14 सामन्यात 37.54 च्या सरासरीने आणि 158.23 च्या स्ट्राईक रेटने 413 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याच्या बॅटमधून तीन अर्धशतके झळकली.