NZ vs PAK 2nd ODI : क्रिकेटच्या मैदानात खेळाडू-खेळाडूंमध्ये भांडण झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. मात्र प्रथमच आता एक अंपायर खेळाडूवर भडकल्याची घटना घडली आहे.विशेष म्हणजे अंपायरचे काम खेळाडूंना शांत करण्याचे असते. मात्र अंपायरच खेळाडूवर भडकल्याने क्रिकेट जगतात आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. या संपुर्ण घटनेचा व्हिडिओ (Video Viral) आता व्हायरल होत आहे.या व्हिडिओची क्रिकेट वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे.
न्यूझीलंड (Pakistan vs New Zealand) संघाची बॅटींग सुरू होती. या बॅटींगच्या 36 व्या ओव्हर दरम्यान एक विचित्रच घटना घडली. हॅरीस रौफ 36 वी ओव्हर टाकायला आला होता.यावेळी हॅरीस रौफचा बॉल ग्लेन फिलिप्सने डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने मारला. हा बॉल मोहम्मद वसीमने पकडत स्टम्पच्या दिशेने थ्रो केला. यावेळी त्याचा नेम चुकला आणि स्टम्पला लागण्याऐवजी तो थेट अंपायर अलीम दार (umpire aleem dar)यांच्या गुडघ्याला लागला. हा बॉल इतका जोरात लागला की तो वेदनेने व्याकुळ झाला होता. अलीम दार यांना बॉल इतक्या जोराने लागला की ते मागे वळले आणि त्यांनी बॉलरचा टी-शर्ट फेकून दिला. यानंतर अंपायरचा राग लक्षात घेऊन पाकिस्तानी खेळाडूंने त्य़ाच्या पायावर मार लागले्ल्या ठिकाणी त्यांना थोडीशी मालीष करून दिली.
पाकिस्तानी बोर्डाने या घटनेचा व्हिडिओ शेअर केला आहे.या व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पडतोय. या व्हिडिओची सोशल मीडियावर चर्चा आहे.
दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडने (NZ vs PAK 2nd ODI)प्रथम फलंदाजी करत 261 धावा केल्या होत्या. डेव्हॉन कॉनवेने शानदार 101 धावा केल्या, तर कर्णधार विल्यमसनचे शतक हुकले आणि तो 85 धावांवर बाद झाला.या बळावर न्यूझीलंडने पाकिस्तानला 262 धावांचे लक्ष्य दिले होते. या लक्ष्याचा पाठलाग करायला उतरलेल्या पाकिस्तानचा संपूर्ण संघ 182 धावांवर ऑलआऊट झाला.पाकिस्तानकडून बाबरने 79 धावा केल्या. न्यूझीलंडकडून अनुभवी टीम साऊदीने आणि ईश सोढीने प्रत्येकी 2 विकेट घेतले.
दरम्यान पाकिस्तानने पहिला वनडे सामना जिंकला होता. त्यानंतर आता न्यूझीलंडने (NZ vs PAK 2nd ODI) पाकिस्तानचा 79 धावांनी पराभव करून मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. आता तिसरा वनडे सामना कोण जिंकतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.