Under-19 Women's T20 World Cup : दक्षिण आफ्रिकेत (South Africa) 19 वर्षाखालील मुलींची टी20 वर्ल्ड कप स्पर्धा सुरु आहे. 14 जानेवारीपासून सुरु झालेल्या या स्पर्धेत जगभरातील 16 संघांनी सहभाग घेतला असून एकूण 41 सामने खेळवले जाणार आहेत. या स्पर्धेची फायनल 29 जानेवारीला रंगणार आहे. या स्पर्धेत शेफाली वर्माच्या (Shefali Varma) नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टीम इंडियाने (Team India) दणक्यात सुरुवात केली आहे. सलग दोन विजय मिळवत टीम इंडिया ग्रुपमध्ये अव्वल स्थानावर आहे.
वेस्ट इंडिजच्या या खेळाडूची चर्चा
या स्पर्धेत वेस्ट इंडिजने महिला संघानेही (West Indies Women Team) दमदार सुरुवात केली आहे. पहिल्या सामन्यात वेस्ट इंडिज महिला संघाने आयर्लंड महिला संघाचा सात धावांनी पराभव केला. अॅशमिनी मुनिसर (Ashmini Munisar) हिच्या नेतृत्वात खेळणाऱ्या वेस्ट इंडिजचा ग्रुप सी मध्ये समावेश आहे. ग्रुप सीमध्ये वेस्टइंडिजचा न्यूझीलंड आणि इंडोनेशियाबरोबरचा सामना बाकी आहे. वेस्ट इंडिज संघाबरोबरच वेस्ट इंडिजच्या एका महिला खेळाडूची सध्या जोरदार चर्चा आहे. आपल्या सौंदर्याने या खेळाडूने सर्वांनाच वेड लावलंय.
या महिला खेळाडूचं नाव आहे शुनेले साव (Shunelle Sawh). अठरा वर्षांची शुनेले साव मैदानात उतरल्यापासून आपल्या सौंदर्यामुळे चर्चेत आहे. तिच्या सौंदर्याचं सध्या सोशल मीडियावर कौतुक होत आहे. प्रत्येक जण तिच्या सौंदर्याची प्रशंसा करतायत. 18 वर्षांची शुनेले साव त्रिनिदाद अँड टोबॅगो इथं राहणारी आहे. लहानपणापासूनच शुनेलेला क्रिकेटची आवड आहे. आपल्या कामगिरीच्या जोरावर तिने थेट वेस्ट इंडिजच्या 19 वर्षाखालील संघात धडक मारली. शुनेले संघाची विकेटकिपर आणि सलामीची फलंदाज आहे.
सचिनने केलं आयसीसीचं कौतुक
दरम्यान, एकोणीस वर्षांखालील मुलीची ही पहिलीच टी20 वर्ल्ड कप स्पर्धा आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) 19 वर्षाखालील मुलींची वर्ल्ड कप स्पर्धा केल्याच्या आयसीसीच्या (ICC) निर्णयाचं कौतुक केलं आहे. याबरोबरच त्याने भारतीय महिला क्रिकेट संघात सर्वोत्तम होण्याची क्षमता असल्याचंही म्हटलं आहे. फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्हीमध्ये अनुभवी खेळाडू आणि काही तरुण प्रतिभावान खेळाडूंचा संघात चांगला समतोल आहे. पहिल्यांदाच 19 वर्षाखालील मुलींची वर्ल्ड कप स्पर्धा होतेय. हा क्रिकेटमध्ये मोठा बदल असल्याचं सचिन तेंडुलकरने म्हटलं आहे.
गेल्या काही काळात महिला क्रिकेटने बरीच प्रगती केली आहे, असंही तेंडुलकरने म्हटलं आहे. अंडर-19 महिला विश्वचषक 2023 मध्ये 16 संघ सहभागी झाले असून एकूण 41 सामने खेळवले जाणार आहेत.