मुंबई : भारतीय क्रिकेटप्रेमींसाठी सध्या डबल ट्रीट आहे.
एकीकडे भारत दक्षिण आफ्रिकेच्या दौर्यावर आहे. तर दुसरीकडे अंडर 18 चा वर्ल्डकप रंगत आहे. अनेकांच्या नजरा पृथ्वी शॉच्या कामगिरीवर खिळल्या आहेत. पण यासोबतच ऑस्ट्रेलियाच्या संघातही काही खेळाडूंच्या कामगिरीवर लक्ष आहे.
जेसन संघा, विल सदरलॅन्ड आणि ऑस्टिन वॉ या तिघांच्या कामगिरीवर अनेकांच्या नजरा खिळल्या आहेत.
जेसन संघा हा भारतीय मूळाचा खेळाडू आहे. ऑस्ट्रेलियन संघाचं नेतृत्त्व करणारा तो पहिला भारतीय वंशाचा खेळाडू आहे.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे प्रशासक जेम्स सदरलॅन्ड यांचा मुलगा विल सदरलॅन्ड याचाही संघात समावेश आहे.
स्टीव वॉ यांचा मुलगा ऑस्टिन वॉदेखील अंडर 19 मध्ये खेळत आहे. त्याच्या कामगिरीकडेही अनेकांच्या नजरा लागल्या आहेत.
ऑल राऊंडर असणार्या ऑस्टिन वॉने वर्ल्डकपमध्ये पहिल्याचा सामन्यात एक रेकॉर्ड केला आहे. पण हा रेकॉर्ड सकारत्मक नाही.
ऑस्टिन वॉने 6 ओव्हर्स टाकल्या. यामध्ये त्याने 1 विकेट घेतली तर 64 धावा दिल्या. धावा देण्याची त्याची सरासरी 10.66 आहे.
अंदर 19 मध्ये ऑस्ट्रेलियन खेळाडूची ही सगळ्यात खराब कामगिरी आहे. अंडर 19 च्या कोणत्याच टुर्नामेंटमध्ये इतकी खराब कामगिरी झालेली नाही. अशी कामगिरी करणारा तो दुसरा ऑस्ट्रेलियन खेळाडू ठरला आहे. ऑस्टिनने 14 बॉलमध्ये केवळ 6 धावा बनवल्या आहेत.