Vijay Hazare Trophy: युवराज सिंग चमकला, ठोकले शतक; हरियाणाचा मोठा विजय

Haryana vs Arunachal Pradesh: विजय हजारे चषकात हरियाणाने युवराज आणि चैतन्य यांच्या शतकी खेळाच्या जोरावर मोठा विजय मिळवला. यावेळी युवराज सिंग याने शतक ठोकले.

Updated: Nov 18, 2022, 10:53 AM IST
Vijay Hazare Trophy: युवराज सिंग चमकला, ठोकले शतक; हरियाणाचा मोठा विजय title=

Yuvraj Singh Century: टीम इंडियाचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग याला कोण ओळख नाही. युवराज सिंग याने आपल्या कारकिर्दीत टीम इंडियाकडून खेळताना अनेक महत्त्वाचे सामने जिंकले. त्याची बॅट चांगलीच तळपायची तेव्हा तो गोलंदाजांवर तुटून पडायचा. यावेळीही युवराजने क्रिकेटच्या मैदानावर कमाल करुन दाखवली, पण तुम्ही ज्याचा विचार करत आहात तो हा युवराज नाही. हा  युवराज सिंग हरियाणाकडून खेळतो. त्याच्या शतकी खेळीच्या जोरावर हरियाणाने मोठा विजय मिळवला. तो  हरियाणाकडून खेळतो आणि सलामीची जबाबदारी पार पाडतो. युवराजने विजय हजारे ट्रॉफी सामन्यात अरुणाचल प्रदेशविरुद्ध 131 धावांची शानदार खेळी केली.

हरियाणा 306 धावांनी जिंकला

या सामन्यात हरियाणाने युवराज आणि चैतन्यच्या शतकांच्या जोरावर 8 बाद 397 धावा केल्या, त्यानंतर अरुणाचल प्रदेशचा संघ 32.3 षटकात 91 धावांवर सर्वबाद झाला. हरियाणाकडून राहुल तेवतियाने 8 षटकांत 24 धावांत 4 बळी घेतले.

अलूर येथे खेळल्या गेलेल्या या गट-क सामन्यात अरुणाचल प्रदेशचा कर्णधार सूरज तायम याने नाणेफेक जिंकून हरियाणाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. हरियाणासाठी युवराज आणि चैतन्य बिश्नोई यांनी धडाकेबाज खेळी खेळली. दोघांनी शतके झळकावली आणि 262 धावांची सलामी भागीदारी केली. हरियाणाने 8 बाद 397 धावा केल्या, त्यानंतर अरुणाचल प्रदेशचा संघ 32.3 षटकात 91 धावांवर गुंडाळला गेला. हरियाणाकडून राहुल तेवतियाने 8 षटकांत 24 धावा देत 4 बळी घेतले. 

युवराजचे 12 चौकार आणि 3 षटकार

11 नोव्हेंबरला 18 वर्षांचा झालेल्या युवराज सिंग याने 116 चेंडूत 12 चौकार आणि 3 षटकार ठोकले. त्याने चैतन्यसोबत पहिल्या विकेटसाठी 262 धावांची भागीदारी केली. 297 धावांच्या सांघिक धावसंख्येवर युवराज दुसरी विकेट म्हणून पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याने 116 चेंडूंच्या खेळीत 12 चौकार आणि 3 षटकार मारले. त्याचवेळी चैतन्यने 124 चेंडूत 134 धावांच्या खेळीत 16 चौकार आणि 1 षटकार ठोकला. निशांत सिद्धूने 19 चेंडूंत 2 चौकार आणि 2 षटकारांसह 36 धावांचे योगदान दिले. 

गोलंदाजांनीही केली कमाल

हरियाणाची धावसंख्या मोठी असल्याचे दिसत होते. 450-470 पर्यंत पोहोचेल असे वाटत होते. पण अरुणाचलच्या गोलंदाजांनी पुन्हा आपला जलवा दाखवला. याब निया जरा महागडा ठरला. त्याने 5 विकेट्स आपल्या नावावर केल्या. त्याने 10 षटकात 84 धावा दिल्यात.