Vinod Kambli Viral Video Update : भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी (Vinod Kambli) याची प्रकृती खालावली असून त्याला नीट चालताही येत नाही अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. त्यामागे कारण ठरलं काही दिवसांपूर्वी विनोद कांबळीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ज्यामध्ये त्याला नीट उभ काय चालताही येत नव्हतं. त्याची अवस्था पाहून इतरांनी त्याला आजूबाजूच्या लोकांनी मदत केली. (Vinod Kambli said i am fine childhood friend shareVinod Kambli new video )
एकेकाळी मैदान गाजवणारा या खेळाडूला काय झालं असा प्रश्न चाहत्यांना पडलाय. अशातच विनोद कांबळीचा नवा व्हिडीओ समोर आला. ज्यामध्ये खुद्द विनोद कांबळी आपल्या प्रकृतीबद्दल माहिती देताना दिसत आहेत.
मुंबईत एका दुकानबाहेर विनोद कांबळी बाईकला धरून उभा होता. त्याला नीट उभं राहता येत नव्हतं. त्याचे पाय डगमगत होते. त्याला रस्त्याच्या फुटपाथवर लोकांनी मदत करत कसं बसं नेलं. त्यानंतर विनोद कांबळीच्या तब्येतीची चिंता चाहत्यांना वाटू लागली आहे.
It's really sad what ALCOHOL can do to you. This is former Indian cricketer Vinod Kambli’s state as he's escorted off his two wheeler by onlookers to safety. pic.twitter.com/ibBUlDOT3k
— PRASHANT KESHWAIN (@pkeshwain) August 5, 2024
तो व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर विनोद कांबळीच्या जवळच्या मित्रांनी त्याच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी त्याच्या घरी भेट दिली. त्याचा शाळेतील वर्गमित्र रिकी आणि मॉर्कस त्यांनी विनोद कांबळीच्या प्रकृतीबद्दलचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. पत्रकार रामेश्वर सिंह यांनी कौटो बंधू आणि विनोद कांबळीच्या भेटीचा एक व्हिडीओ आणि फोटो त्यांच्या एक्स अकाऊंटवर पोस्ट केलाय.
या व्हिडीओमध्ये मित्रांना भेटून विनोद कांबळी आनंदी आणि मस्तीचा मूडमध्ये होता. त्याच्या मित्रांनी त्याला विचारलं तू कसा आहेत. त्यावर कांबळी म्हणाला की, मी बरा आहे. मॉर्कस मी ठीक आहे. देवाच्या कृपेने मी ठीक आहे. सोशल मीडियावर विश्वास ठेवू नका.
पुढे त्याच्या मित्राने फलंदाजी करण्यासाठी तयार आहे का? असं विचारल्यानंतर मी तयार असल्याचं विनोद कांबळी म्हणालाय. यावेळी बोलताना त्याने फिरकीपटूंना इशारा दिला आहे. त्यांनी मैदानाच्या बाहेर उभं राहावं, असंही खेळाडू विनोदाने म्हणाला.
After facing some health issues, former Indian cricketer, #Vinodkambli is fit and fine, and doing well. His school mate, Ricky Couto and First Class Umpire, Marcus Couto spent 5 hrs with him yesterday during which he was in good spirits and spoke to several other friends as well. pic.twitter.com/e79LpBKRoc
— Rameshwar Singh (@RSingh6969a) August 9, 2024
त्यासोबतच विनोद कांबळीच्या मित्रांनी सांगितलं की, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडीओ हा जुना आहे. आम्ही त्याला भेटल्यावर जुनी हिंदी गाणी ऐकली. 1990 मधील वेस्ट इंडिज मॅचच्या आठवणीला उजाळा दिला. शेन वॉर्नचा सामना त्याचा खेळीबद्दल आम्ही बोललो. जेव्हा आम्ही भेटतो तेव्हा आम्ही मजा करतो, असंही ते म्हणालेत.
आम्ही तुम्हाला सांगतो विनोद कांबळीचं वय 52 वर्षांचं आहे. तरदुसरीकडे सचिन तेंडुलकरने त्याला आर्थिक मदत करण्याच आवाहन केलंय. विनोद कांबळीच्या प्रकृतीबद्दल बोलायचं झालं तर ह्रदयविकारासह डिप्रेशनचाही त्रास त्याला झाला होता. अनेक वेळा तो हॉस्पिटलमध्ये दाखलही झाला होता.