नवी दिल्ली : क्रिकेटच्या मैदानात 6 बॉलवर 6 षटकार ठोकल्याचे क्षण पाहिले असतील पण एकाच ओव्हरमध्ये अर्धी टीम तंबुत परतल्याचं पाहिलं का? असा क्षण बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी अत्यंत लाजीरवाणा आहे. घातक बॉलरने एका ओव्हरमध्ये 6 विकेट्स घेतल्या.
घातक बॉलरने पहिल्या बॉलवर कॅच आऊट दुसऱ्या बॉलवर रन आऊट आणि पुढच्या 4 बॉलवर क्लीन बोल्ड असे एकामागोमाग 6 फलंदाज तंबुत धाडले. क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं.
नेपाल प्रो क्लब चॅम्पियनशिपमध्ये मलेशिया क्लब इलेवन आणि पुश स्पोर्ट्स दिल्ली यांच्यात आंतरराष्ट्री टी 20 सामना खेळवण्यात आला. पुश स्पोर्ट्स दिल्लीने 6 बॉलमध्ये आपल्या टीमचे 6 विकेट्स गमावले. हा ऐतिहासिक विक्रम घातक बॉलर विरनदीप सिंहने केला आहे.
विरनदीप सिंहने पहिल्या बॉलवर कॅच आऊट केलं. तर दुसऱ्या बॉलवर रनआऊट, पुढच्या 4 बॉलवर 4 विकेट्स घेतल्या. पुश स्पोर्ट्सची धावसंख्या 20 षटकांत 9 बाद 132 धावा अशी होती. हा सर्वात लाजीरवाणा विक्रम पुश स्पोर्ट्स दिल्लीच्या नावावर झाला. तर विरनदीपच्या ह्या ऐतिहासिक कामगिरीचं सोशल मीडियावर खूप कौतुक झालं.