दिल्ली : भारतीय टीमचा माजी कर्णधार विराट कोहली पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. विराट मैदानावर जितका अग्रेसिव्ह असतो तितकाच तो मैदानाबाहेर शांत दिसून येतो. त्याचसोबत लोकांच्या मदतासाठी देखील विराट कोहली नेहमी पुढाकार घेतो. तर नुकतंच विराटने एका लहान मुलीची मदत केली आहे आणि याचमुळे तो चर्चेत आला आहे.
पूजा बिश्नोई या 9 वर्षांच्या मुलीने नुकताच तिचा पाचवी पास झाल्याचा निकाल ट्विटरवर शेअर केला आहे. यामध्ये मुलीला 76.17% गुण मिळाले आहेत. यासोबतच निकाल शेअर करताना मुलीने ट्विटरवर भारतीय टीमचा माजी कर्णधार विराट कोहलीचं नावही घेतलं आहे.
ट्विटरवर तिचा निकाल शेअर करताना पूजा लिहिलंय की, “माझा पाचवीचा निकाल लागला आहे. मला 76.17% गुण मिळाले आहेत. मला देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या शाळेत प्रवेश मिळवून देण्यासाठी मी विराट कोहली सरांचे आभार मानते. धन्यवाद"
आज मेरे 5th क्लास का result आया है व 76.17% बनाएं है।
विराट कोहली सर को धन्यवाद देती हूँ कि उन्होने मुझे देश की 2nd Rank वाली स्कूल में admission दिलाया। #ViratKohli
Thank You @imVkohli @vkfofficial pic.twitter.com/qppLqmFH0W— Pooja Bishnoi (@poojabishnoi36) March 23, 2022
पूजा बिश्नोईचे स्वप्न आहे की, ती मोठी होऊन एक उत्तम ऍथलीट होणार आहे. शिवाय तिचं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी विराट कोहली तिला पूर्ण मदत करत असल्याची माहिती आहे.
विराट कोहलीचं फाऊंडेशन या 9 वर्षांच्या मुलीच्या शिक्षणाचा, प्रवासाचा तसंच खाण्या-पिण्याचा खर्च उचलतंय. इतकंच नाही तर विराटने पूजाला राजस्थानमधील जोधपूरमध्ये फ्लॅटही घेऊन दिला आहे.