मुंबई : फॉर्ब्स मासिकाने (FORBES LIST) जाहीर केलेल्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या भारतीय सेलेब्रिटींमध्ये टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) अव्वल स्थानी आहे. विशेष म्हणजे विराटने दबंग सलमान खानला, बॉलिवूड बादशाह शाहरुख, क्रिकेटर सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंग धोनी यांनाही मागे टाकत अव्वल स्थान पटकावले आहे.
विराट कोहलीची एकूण वार्षिक कमाई ५० लाख डॉलर्स असल्याचे सांगितली जात आहे. भारतीय कर्णधार मात्र या यादीत १७ स्थानांनी घसरून १०० व्या स्थानावर गेला आहे. बार्सिलोना आणि अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉल लिओनेल मेस्सी (Lionel Messi) याने अव्वल स्थान गाठले आहे. मेस्सीने अमेरिकेच्या बॉक्सर फ्लायड मेवेदरला मागे टाकत अव्वल स्थानावर झेप घेतली आहे. महत्त्वाचे म्हणजे व्यावसायिक बॉक्सर मेवेदरने आपले सर्व सामने जिंकून यापैकी निम्म्याहून अधिक सामन्यात प्रतिस्पर्ध्याला बाद केले. या यादीत पोर्तुगालचा फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डो दुसर्या क्रमांकावर आहे.
विराट कोहली याने केवळ सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंग धोनी आणि रोहित शर्मा यासारख्या क्रिकेटपटूंवरच नव्हे तर अभिनेता सलमान खान, शाहरुख खान आणि अक्षय कुमार यांच्यासारख्या सेलिब्रिटींना कमाई आणि लोकप्रियतेच्या बाबतीतही आघाडीवर असणाऱ्यांनाही मागे टाकले आहे.अभिनेता अक्षय कुमार दुसर्या स्थानावर आहे. त्याची कमाई २९३.२५ कोटी रुपयांच्या घरात आहे. अक्षयचे जास्त उत्पन्न असूनही लोकप्रियतेच्या बाबतीत विराटपेक्षा कमी असल्याने अक्षय दुसर्या स्थानावर फेकला गेला आहे.
फोर्ब्स मासिकाने भारताच्या १०० सेलिब्रिटींची यादी प्रसिद्ध केली असून त्यामध्ये विराट कोहली पहिल्या क्रमांकावर आहे. गेली तीन वर्षे सलमान खान या यादीत पहिल्या क्रमांकावर होता. इतकेच नाही तर फोर्ब्सच्या यादीमध्ये प्रथमच भारतीय खेळाडू प्रथम क्रमांकावर पोहोचला आहे.
फोर्ब्स मासिकाचे म्हणणे आहे की, ही यादी व्यवसाय आणि जाहिरातींद्वारे मिळवलेल्या उत्पन्नाच्या आधारे आणि त्यांची लोकप्रियता यावर आधारित आहे. १ ऑक्टोबर २०१८ ते ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत केलेल्या कमाई आणि प्रसिद्धीच्या मूल्यांकनच्या आधारे ही यादी तयार केली गेली आहे.
३१ वर्षीय कोहलीची कमाई २५२ कोटी ७२ लाख रुपये आहे. कोहलीच्या कमाईत क्रिकेट सामन्याचे मानधन, बीसीसीआयचा करार, ब्रँड अॅम्बेसेडरचे उत्पन्न यांचा समावेश आहे. याशिवाय कोहली इन्स्टाग्रामच्या प्रत्येक प्रायोजित पोस्टसाठी कोट्यवधी रुपये घेतो, असेही सांगण्यात आले आहे.